सेलू ( करीम खान )
येथिल स्वस्त धान्य दुकानदार मनमानी पध्दतीने कारभार करत असुन गोरगरीब जनतेला राशन दुकानावरुन धान्य घेण्यासाठि नाकी नऊ येत असुन शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी करावी व गोरगरीब जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी येथिल युथ फोरम तर्फे तहसिलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, येथील स्वस्त धान्य दुकानदारांची दुकान उघडण्याची केणतीच अशी ठराविक वेळ नाही. कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी दुकाने उघडल्या जातात परिणामी मजदुर वर्ग, कामगार वर्ग यांना स्वस्त धान्य घेण्यासाठी अडचन निर्माण होते. या शिवाय ग्राहकांना दुकानदार ठराविक वस्तू, ठराविक प्रमाणात देत नाहीत. एक वस्तू देतात तर एक वस्तू देत नाही. ठरलेल्या प्रमाणात वस्तू न देता कमी वस्तू देतात. एखाद ग्राहकाने प्रश्न विचारले तर उध्दत उत्तरे देतात.
स्वस्त धान्य दुकानांच्या वितरण प्रणालीत सुधारणा करण्यात यावी, दुकान उघडण्याचे वार, दिनांक व वेळ दुकानांच्या दर्शनी भागात लावण्यात यावे, शासनाने ठरवून दिलेल्या सर्व वस्तू, ठरवून दिलेल्या प्रमाणात ग्राहकांना देण्यात याव्यात असे आदेश स्वस्त धान्य दुकानदारांना देऊन त्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा नसता युथ फोरम तर्फे आँदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें