नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते शेख महेमुद व शेख राहील यांचा सत्कार... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 29 दिसंबर 2020

नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते शेख महेमुद व शेख राहील यांचा सत्कार...



सेलू ( प्रतिनिधि ) मराठी लघुपट एक थेंब प्रेमाचा या लघुपटाला वेगवेगळ्या आंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात आठ पुरस्कार मिळाले. सदरील चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लेखन सेलू येथिल सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक शेख महेमुद यांनी लिहीले असुन या चित्रपटात त्यांचा मुलगा शेख राहील याने भुमिका साकारली आहे.

      सेलूतील लेखक व कलाकारांनी आंतरराष्ट्रिय स्तरावर नावलौकीक प्राप्त केल्याबद्दल नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी शेख महेमुद व शेख राहील यांचा नगर परिषद कार्यालयात शाल व पुष्पहाराने सत्कार केला. या प्रसंगी नगरसेवक अजिम कादरी, नगरसेवक वहीद अन्सारी, अशोक कासार, पत्रकार विलास शिंदे, गिरीश लोडाया, जकी सर, सय्यद इसाख अदि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें