जमात-ए-इस्लामी हिंद तर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 12 दिसंबर 2020

जमात-ए-इस्लामी हिंद तर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार.



सेलू ( प्रतिनिधि ) १० डिसेंबर मानवअधिकार दिवसाचे औचित्य साधून मानवांच्या हक्कासाठी व कल्याणासाठी सतत कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते यांचा शाल व भेटवस्तू देऊन नगरसेवक शेख अय्युब भाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाची प्रस्तावना जकी अहेमद सिद्दिकी यांनी केली. प्रस्तावणेत त्यांनी इस्लाम धर्माचे पैगंबर यांनी मानव अधिकाराची शिकवण आज पासुन जवळपास १४०० वर्षापुर्वि दिल्याचे प्रतिपादन केले. 

    या वेळी रामकृष्ण शेरे, मौलाना नसरुल्ला नदवी, एड. विष्णु ढोले, दत्तूसिंग ठाकुर, नगरसेवक मनिष कदम, नगरसेवक शेख रहीम भाई, शेख महेमुद सर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेख महेमुद सर यांनी तर आभार प्रदर्शन शेख इमाम निझामी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पत्रकार सय्यद ईसाक , जुनेद अन्सारी, सिद्दिकी मोईन, शोहेब हाश्मी, अमजद भाई, गफूर भाई, करीम खान अदिंनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें