सेलू ( प्रतिनिधि ) मास इंडिया न्युज मुंबई, मुस्कान फाऊँडेशन मुंबई, युथ फोरम सेलू यांच्या संयुक्त विद्य्यामाने असद लष्करीया यांच्या तर्फे सेलू शहरातील अरोग्य विभाग, पोलिस विभाग, पत्रकार,नगर परिषद यांचे कर्मचारी व युथ फोरमचे युवा कार्यकर्ते यांचा कोरोना योध्दा म्हणुन सत्कार व सम्मान करण्याचा कार्यक्रम पत्रकार सय्यद इसाख यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेवक शेख रहीम भाई, नगरसेवक शेख म. अय्युब भाई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय हरबडे, डॉ
गोळेगाँवकर, डॉ. गणेश मुळे, सेलू पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड, पोलिस उपनिरीक्षक जसपालसिंग कोटतिर्थवाले, पोलिस उपनिरीक्षक माळगे, नगरसेवक शेख कासिमभाई, नगरसेवक अजिम कादरी, पत्रकार जकीयोद्दिन खतिब, पत्रकार पठाण अनवर , मल्लिकार्जुन स्वामी, अशोक कासार युथ फोरमचे शेख साजीद शेख रहीम, पठाण करीम खान रहीम खान, डॉ. मुताहेर खान सह अनेकजन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेख महेमुद सर यांनी तर अाभार प्रदर्शन सिद्दिकी मोईन यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें