@बोरी कौसडी गुळखंड येथील युवा मंचचाचे उपक्रम@
हजरत टिपू सुलतान यांची जयंती विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साजरी करण्यात आली.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ग्रामीण रुग्णालय येथे हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त ठेवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला आहे.या रक्तदान कार्यक्रमाचे उद्घाटन एका सर्वसामान्य व्यक्तीच्या हाती रिबीन कापुन करण्यात आला होता. हे रक्तदान जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीचे माधव गोचडे निशा खंदारे प्रतिक दीपक कंडेरे यांनी संकलन केले.
बोरी,गुळखंड येथील ह.टिपू सुलतान युवा मंचच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा होत असल्यामुळे जागोजागी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची अत्यंत गरज आहे.बोरी येथे हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून हा कार्यक्रम चांगल्या आणि ते यशस्वी पार पाडला डॉ.बकान,डॉ.सोळंके,जिल्हाध्यक्ष नईमोद्दीन कौसडीकर,शेख वसीम,शेख सोहेल,जुनेद खान,शेख मोबीन,मौलाना इसाक,करून नागरे,नागसेन भेरजे,अरुण पाटील,शेख सद्दाम,बाबू पठाण,मगदूम पटेल यांच्या हस्ते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बोरी गुळखंड येथील हजरत टिपू सुलतान युवा मंचच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें