प्रतिनिधी,दि.18/11/2020.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे 20 नोव्हेंबर शुक्रवार रोजी होणाऱ्या हजरत टिपू सुलतान जयंती उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी हजरत टिपू सुलतान युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शेख नईमोद्दीन कौसडीर यांनी दिनांक 15 नोव्हेंबर पासून कौसडी बोरी कुपटा या सर्कल मधील विविध गावात जाऊन या भव्य रक्तदान शिबिरासाठी नवयुवक तरुण रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे महत्त्व पटवून व रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. या भव्य रक्तदान साठी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी शेख नईमोद्दीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू तालुक्यातील गुळखंड येथे बैठक घेण्यात आली होती तसेच बोरी येथील कौसडी रस्त्यावर असलेल्या आरबी मदरसा व गावातील एका सभागृहात या रक्तदान शिबिरासाठी बैठक घेण्यात आली या बैठकीत नवयुवक तरुण तसेच शेकडो रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त रक्तदाते रक्तदान करतील असे आश्वासन नवयुवक तरुण रक्तदात्यांनी दिले या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हजरत टिपु सुलतान युवा मंच बोरी चे मार्गदर्शक शेख सोहेल शाखा अध्यक्ष जुनेदखाँन उपाध्यक्ष शेख सोनु गुळखंड येथील हजरत टिपू सुलतान युवा मंच चे मार्गदर्शक शेख बाबा भाई शाखा अध्यक्ष मौलाना इसाहक उपाध्यक्ष शेख सद्दाम,रवी पांचाळ,शेख सोहेल,शेख परवेज,शहेबाज पठाण,आफरोज पठाण यांच्या सह हजरत टिपू सुलतान युवा मंचचे सदस्य हे आहे. हे रक्तदान शिबिर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे .तरी या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवावा असे आव्हान जिल्हाध्यक्ष शेख नईमोद्दीन कौसडीकर तालुकाध्यक्ष नईम पठाण जाबेर मुल्ला यांनी केले आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें