परभणी जिल्ह्यातील एकमेव पालम नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2020 जाहीर झाली असून नगरपंचायतीची वार्ड आरक्षणाची सोडत दिनांक 10/11/ 2020 रोजी सकाळी 11 वाजता पालम शहरातील गजानंद मंगल कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आरक्षण सोडत बैठकीत लहान मुलांच्या हस्ते ड्रॉ पद्धतीने चिठ्ठ्या काढून वार्डातील आरक्षण जाहीर करण्यात आले. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी आरक्षित जागे संदर्भात मार्गदर्शन केले. अनुसूचित जातीसाठी दोन जागा निश्चित करण्यात आल्या. त्यापैकी वार्ड क्रमांक एक येथे अनुसूचित जाती पुरुष साठी जागा आरक्षित झाली तर वार्ड क्रमांक 17 येथे अनुसूचित जाती महिलांसाठी जागा आरक्षित करण्यात आली.ओबीसींच्या पाच जागा आरक्षित करण्यात आला. त्यापैकी महिलासाठी तीन पुरुषासाठी दोन जागा आरक्षित करण्यात आल्या तर सर्वसाधारण महिलांसाठी पाच जागा आरक्षित असल्याचे जाहीर करण्यात आले. अनुसूचित जातीसाठी वार्ड क्रमांक 1 अनुसूचित जाती महिलांसाठी वार्ड क्रमांक 17 नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी 2,8,10,11,13 तर यापैकी महिलांसाठी 8,10,11 आरक्षित झालेल्या आहेत सर्वसाधारण महिलांसाठी वार्ड क्रमांक 4,5,7,12 व 14 हे आरक्षित झाले आहेत तर उर्वरित वार्ड 3,6,9,1516 सर्वसाधारण पुरुषांसाठी असल्याचे घोषित करण्यात आले. या बैठकीत पालम नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री संतोष लोमटे, नगरपंचायत चे कर्मचारी नागसाळे,लोंढे, कारभाजणे, खालेद पठाण,प्रदीप थिटे, ओ.एस.बालासाहेब कानडे तसेच पत्रकार व राजकीय पार्टीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शेवटी पालम नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री संतोष लोमटे यांनी उपस्थितांचे सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे घोषित केले.
गुरुवार, 12 नवंबर 2020
Home
परभणी
पालम नगरपंचायतीच्या वॉर्ड निहाय आरक्षण जाहीर,इच्छुकांची अपेक्षा भंग तर नवीन उमेदवार लागले कामाला.
पालम नगरपंचायतीच्या वॉर्ड निहाय आरक्षण जाहीर,इच्छुकांची अपेक्षा भंग तर नवीन उमेदवार लागले कामाला.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें