सेलु पोलिसांची गुटखा माफियांवर मोठि कार्यवाहि,75 हज़ाराचा गुटखा व दोन गुटखा माफिया ताब्यात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 नवंबर 2020

सेलु पोलिसांची गुटखा माफियांवर मोठि कार्यवाहि,75 हज़ाराचा गुटखा व दोन गुटखा माफिया ताब्यात.



संपादक,अनवर पठाण. ( तेज़्ज़न्युज़24 ) दि.08/11/2020.सेलू शहरातील झाकिर हुसेन नगर येथून 75 हजार रुपये किमतीचा सुगंधित सुपारी तसेच गुटखा आणि जर्दा असलेला मुद्देमाल रविवार दि .08 नोव्हेंबर रोजीसेलू पोलिसांच्या वतीने पकडण्यात आला . महाराष्ट्र शासनाने कलम 328 नुसार मानवी शरीरास अपायकारक असणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थ व तंबाखू विकण्यास बंदी असताना देखील सेलू शहरात मागील कित्येक दिवसापासून छुप्या मार्गाने लपून छपून गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती सेलू पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश बारहाते , पी.एस.आई संतोष माळगे आणि कर्मचाऱ्यांनी रविवार दि . 8 नोव्हेंबर रोजी सेलू शहरातील जाकीर हुसेन नगर येथील जाऊन छापा टाकला असता तेथे मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळल्याने पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त करून आरोपी विजय झंवर , आरोपी सलीम अन्सारी यांना अटक करण्यात आली . सेलू पोलीस ठाण्यात मुद्देमाल जप्त करण्यात आला . वरिल दोन्ही आरोपीवर कलम 328 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असन घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगांवकर करित आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें