मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केल्याने 420 प्रमाणे गुन्हा दाखल करा. - आप'ची पोलीस स्टेशनला तक्रार दाखल - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 2 अक्टूबर 2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केल्याने 420 प्रमाणे गुन्हा दाखल करा. - आप'ची पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

 


सिल्लोड (प्रतिनिधी)दि.02/10/2020 :- आम आदमी पक्षाच्या वतीने औरंगाबाद जिल्हा सहसंयोजक ॲडव्होकेट शेख उस्मान शेख ताहेर यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाचे सिल्लोड सोयगाव विधानसभा अध्यक्ष महेश कुमार शंकरपेल्ली, सिल्लोड तालुका अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय गोंगे सिल्लोड शहराध्यक्ष शेख रफीक अब्दुल रहीम  यांच्यासह आप'च्या पदाधिकार्‍यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध विश्वासघात केल्याप्रकरणी भादवि कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करावा म्हणून पोलीस ठाणे सिल्लोड शहर, सिल्लोड ग्रामीण यांच्यासह तहसीलदार सिल्लोड व उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये शिवसेना प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वीज ग्राहकांना (जनतेला) काही वचन दिले होते. त्यामध्ये

प्रामुख्याने विजबिलाबाबत ३०० युनिट वीज वापर करणाऱ्यांना ३० टक्के

स्वस्त वीज करण्याचे वचन होते. यांच्या वचननाम्याची प्रत सोबत जोडली आहे.

या वचनांच्या आधारे राज्यातील जनतेनी यांना निवडून आणले आणि हे राज्याचे

मा.मुख्यमंत्री झालेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर यांनी राज्यातील जनतेला दिलेली वचन पाळणे यांची राजकीय आणि नैतिक जबबदारी होती, परंतु यांनी दिलेले वचन न पाळून जनतेची फसवणूक केलेली आहे. या उलट देशात आणि राज्यात महामारीचे संकट असतांना दि.१ एप्रिल २०२० पासून जवळपास २० % वीज दर वाढ करून रु. ३ प्रति युनिट तयार होणारी विज रु. १५ वसूल करते, एकूणच राज्यातील जनतेसोबत फार मोठा धोका केला आहे. हे सर्व प्रश्न घेवून आम आदमी पार्टी व राज्यातील नागरिक सरकार कडे

वारंवार विनंती करीत आहेत, निवेदन देत आहेत, अनेक वेळा आंदोलन केलीत,

पालकमंत्री यांच्या घराचा क्रांतीदिनी घेराव केला, वीज कार्यालयांना ताला

ठोको आंदोलन केले परंतु सरकार केवळ चर्चा करून केंद्र सरकार कडे बोट दाखवीत आहे. याच पद्धतीने जर एखादी व्यावसायिक कंपनी ग्राहकांना आमिष दाखवून त्यांची दिशाभूल करत असेल तर त्या कंपनीवर IPC ४२० अनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात. अशाच प्रकारचे आमिष दाखवून राज्यात श्री उद्धव ठाकरे राज्याचे मा.मुख्यमंत्री झालेत आणि आता निवडणुकीपूर्वीचे वचन न पाळून जनतेची फसवणूक करीत आहेत. एवढेच नव्हे तर महामारी च्या संकट काळी वीजदर वाढवून जनतेसोबत धोखाधडी केली आहे, त्यामुळे त्याच धर्तीवर ग्राहक कायदा आणि IPC 420 अंतर्गत राज्याचे मा मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून आप'च्या वतीने पोलीस ठाणे सिल्लोड शहर, सिल्लोड ग्रामीण, अजिंठा यांच्यासह तहसीलदार सिल्लोड व उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून सदर तक्रारीवर जिल्हा संघटनमंत्री अजबराव मानकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. उस्मान शेख ताहेर, सिल्लोड- सोयगांव विधानसभा अध्यक्ष महेशकुमार शंकरपेल्ली, सिल्लोड तालुका अध्यक्ष डॉ. दत्तात्रेय गोंगे, सिल्लोड शहराध्यक्ष शेख रफिक अब्दुल रहीम, तालुका उपाध्यक्ष नजीर तडवी, संघटन मंत्री इस्माईल शेख सलीम शेख, शहर सचिव इमरान देशमुख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मुस्ताक खा पठाण मेवाती, आप पालक आघाडीचे असलम खान पठाण, सुनील पाटील गुळवे, विशाल पाटील शेजुळ, मोबीन शहा आदी आप'चे पदाधिकारी स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें