वालुर कन्हेरवाडि पुराच्या पाण्यात वाहून जाणारा शेतकरी बालबाल बचावला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 1 अक्टूबर 2020

वालुर कन्हेरवाडि पुराच्या पाण्यात वाहून जाणारा शेतकरी बालबाल बचावला.

              👆  विडिओ बातमीसाठि येथे क्लीक करा 👆



संपादक.(अनवर पठाण) दि.01/10/2020.
 परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय, काल सायंकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी तास भर मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाले, ओढ्याना पूर आला, सेलू तालुक्यातील कन्हेर वाडी परिसरातील ओढायला आलेल्या  पुरात एक शेतकरी वाहून जात असतांना बालबाल बाचावलाय,
सायंकाळच्या सुमारास शेतकरी आपल्या घरी परतत असताना पुलावरून पलीकडे जातांना पाण्याचा अंदाज न आल्याने 40 वर्षीय लहू सोनवणे नामक शेतकरी  पुराच्या प्रवाहात वाहून जात होता, कोणीही पाण्यात जाण्याचे धाडस केले नाही पण दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचवण्यासाठी कन्हेर वाडीचे ग्रामस्थ असलेले नारायण वाटुरे यांनी पाण्यात उतरत आपला जीव धोक्यात घालून त्या शेतकऱ्याचे प्राण वाचवले आणि मोठा अनर्थ टळलाय, खरच देव तारी त्याला कोण मारी असे असले तरी ही नागरिकांनी पुराच्या पाण्यात उतरून आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रसार माध्यमे आणि प्रशासन वारंवार नागरिकांना करतायत पण असे असले तरीही पुराच्या पाण्यात जीव गमावण्याच्या घटना परत परत समोर येतायत त्यामुळे Tezznews24 कडून सर्व नागरिकांना परत एकदा आवाहन करण्यात येते की त्यांनी पुराच्या पाण्यात उतरू नये.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें