परभणी:दि.14/09/2020.
आज संपूर्ण जगात कोरोना ने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात ही मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला आहे. त्यामुळे हॉस्पिटल मध्ये बेड मिळत नाहीत, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अश्या या कठीण परिस्थितीत वर्ल्ड मराठा आँर्गनायझेशन हि संघटना जागोजागी कुठल्याही स्वरुपात मदत करुन माणुसकी चे दर्शन घडवतेय.
या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या संघटनेचे नेटवर्क खुप मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे.फेसबुक, व्हाट्सऍप, व ईतर सोशल मिडीया च्या सहाय्याने हि संघटना कुठल्याही प्रकारची मदत तात्काळ मिळवुन देते.
फेसबुकवर जवळपास या संघटनाचे लाखोंच्या संख्येत सभासद आहेत, तसेच व्हाट्सऍप वर या संघटनेचे WMO या नावाने प्रत्येक जिल्ह्याचे असे २०-२५ ग्रुप आहेत. या ग्रुप मध्ये कुणालाही कुठल्याही प्रकारची मदत लागली की ते ग्रुप वर पोस्ट टाकल्यानंतर लगेच काही मिनीटात त्यांचा प्राॅब्लेम सोडवायला, किंवा मदत करायला सुरुवात होते आणि काही वेळात मदत मिळुन तो प्राॅब्लेम सोडवला जातो.
कुणाला हाॅस्पिटल मध्ये बेड मिळत नसेल तर बेड उपलब्ध करून देणे, कुणाला रक्त मिळत नसेल तर रक्त मिळवुन देणे, अँम्बुलन्स उपलब्ध करुन देणे, रात्री अपरात्री कुठे कुणाची गाडी बंद पडली तर ग्रुप चे मेंबर जाउन कोणतीही पुर्व ओळख नसताना मदत करतात, ह्या अडचणी ग्रुप चे अडमिन व इतर सभासद सहजरित्या सोडवतात.नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना माहीत असलेल्या ठिकाणी नोकरी मिळवुन देणे,कधी गरज पडलीच तर स्वताच्या खिश्यातुन पैसे देऊन मदत केली जाते. आज प्रशासन यंत्रना तोडगा पडत असताना वर्ल्ड मराठा आँर्गनायझेशन लोकांना मदत करत आहे. या ग्रुपमध्ये डाॅक्टर,वकील,पोलीस, पत्रकार व ईतर सामाजिक कार्यकर्ते पण सभासद आहेत. या ग्रुपचा राजकारणाशी कुठलाही संबंध नसुन फक्त माणुसकीच्या नात्याने होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न राहतो.
वर्ल्ड मराठा आँर्गनायझेशन चे कार्य अतुलनीय आणि प्रशंसनीय आहे. संघटनेचे हे कार्य समाजाला नक्कीच दिशा देणारे ठरेल.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें