चीनचे भारताविरोधातील मोठे कारस्थान उघडकीस - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 14 सितंबर 2020

चीनचे भारताविरोधातील मोठे कारस्थान उघडकीस



तेज़्ज़न्युज़24.दि.14/09/2020. 

चीनचे भारताविरोधातील मोठे कारस्थान उघडकीस आले आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार अशा देशातील तब्बल दहा हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी चीनकडून करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. चीन सरकार काही कंपन्यांच्या माध्यमातून भारतात हेरगिरी करत असल्याचे समोर आले आहे. तसेच शेनजेन ही कंपनी भारतात तब्बल १० हजार लोकांची हेरगिरी करत असून, या कंपनीचा चीन सरकार आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्षाशी थेट संबंध असल्याचेही उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने टिकॉटॉकसह शेकडो चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही हेरगिरी उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें