दि.23/09/2020.
ब्रिटनमध्ये करोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची चिन्ह दिसत असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. करोना व्हायरसची दुसरी लाट रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लोकांना ‘शक्य असेल तर घरातूनच काम करा’ असे आवाहन केले आहे तसेच बार आणि हॉटेल्स लवकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.तात्काळ पावलं उचलली नाहीत तर, मृतांची संख्या वाढू शकते असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. जॉन्सन यांनी मार्चसारखा लॉकडाउन पुन्हा केलेला नाही. पण करोनाचा फैलाव आटोक्यात आला नाही तर पुढील निर्णय घ्यावे लागतील असे जॉन्सन यांनी म्हटले आहे. बोरीस जॉन्स यांनी मंत्री आणि युनायटेड किंगडमच्या नेत्यांची बैठक घेतली. असोसिएटेड प्रेसने हे वृत्त दिले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें