खासदार अमोल कोल्हे यांच्या त्या विधानावरुन राष्ट्रवादीत मतभेद . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 23 सितंबर 2020

खासदार अमोल कोल्हे यांच्या त्या विधानावरुन राष्ट्रवादीत मतभेद .


विशेष. प्रतिनिधी.दि.23/09/2020.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं अशी मागणी काही मराठा संघटनांनी केली आहे. त्याला ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. यातच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी ओबीसी समाजानं मन मोठं करावं, त्यामुळे मराठा समाजातील वंचितांना आरक्षण मिळेल असं विधान केले होते. मात्र या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मतभेद असल्याचं समोर आलं आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सरचिटणीस बबन मदने यांनी खासदार अमोल कोल्हेंच्या विधानाला जोरदार विरोध केला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी अशाप्रकारे विधान करुन मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजात संभ्रम निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बबन मदने म्हणाले की, ओबीसी समाजाने मोठे मन दाखवावे म्हणजे काय करायचे? आपल्या भूमिकेमुळे मराठा आणि ओबीसी समाजात गैरसमज पसरत आहे. मराठा समाजाने ओबीसीमध्ये आरक्षण मागू नये अशी ठाम भूमिका मदने यांनी मांडली.


तसेच मराठा समाजाला जे आरक्षण हवं असेल ते त्यांनी वेगळे मागावे, मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात टाकल्यास याचा नक्कीच विरोध करणार आहोत. डॉ. अमोल कोल्हे स्वत:ओबीसी आहेत परंतु त्यांची भूमिका आम्हाला ओबीसी म्हणून मान्य नाही. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या आम्ही विरोधात आहोत. पक्षाचे खासदार असले तरी पदाधिकारी म्हणून त्यांची भूमिका आम्हाला मान्य नाही असं राष्ट्रवादीचे मुंबई सरचिटणीस आणि ओबीसी विजे एनटी समन्वय समितीचे राज्य समन्वयक बबन मदने यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें