वालुर येथे स्वच्छ भारत अभियानाअर्तगत वैयक्तिक शौच्छलय अनुदान यादीत अनेकाची नावच आले नसल्याची तक्रार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 12 जनवरी 2020

वालुर येथे स्वच्छ भारत अभियानाअर्तगत वैयक्तिक शौच्छलय अनुदान यादीत अनेकाची नावच आले नसल्याची तक्रार.

मौलाना अकरम कुरेशी याची गटविकासाधिकारी अधिकारी पंचायत समिती सेलु कार्यालयात तक्रार.


वालुर प्रतिनिधी.

आज दिनांक. 10/01/2020 शुक्रवार रोजी वालुर येथील सामाजिक कार्यकर्ते मौलाना अकरम कुरेशी यांनी गटविकासाधिकारी पंचायत समिती सेलु येथे लेखी तक्रार केली
यामध्ये वालुर येथील पिढ्या न पिढ्या स्थायीक राहात असलेल्या लोकाची या यादीमध्ये नाव नाहि
तर दुसरीकडे अतिक्रमण करून अनधिकृत राहात असलेल्या लोकाची मोठ्या प्रमाणात नाव आहे तर एकाच कुटुंबातील अनेक सदस्याची
नावे स्वछ भारत अभियान अनुदान यादीत कशी आली त्यामुळे या   अनुदानाचा लाभ मिळतो त्याला खुपच तर
एखाद्याला काहिच नाही
अशी परिस्थिती वालुर येथे संद्या आहे
तर याविषयी वालुरच ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतीमधील कर्मचार्याना विचारपुस केली असता आम्हाला काहिच माहिती नाहि सर्व यादी पंचायत समिती कार्यलय सेलु येथुन आलेली आसल्याचे सागण्यात येत आहे
तर पंचायत समिती सेलु येथे संबंधित योजनेच अधिकारी श्री. देवमाने याच्याशी या विषयी माहिती विचारली असता ते म्हणतात
आम्ही फक्त ग्रामपंचायतीने दिलेली कागदपत्रे पुढे जिल्हा परिषद कार्यालयात पाठवतो आमच्या हातात ईतकेच आहेत बाकि जिल्हा परिषद परभणी याच्याकडेच मंजुरीचे अधीकार असल्याचे
सेलु पंचायत समितीमधील कर्मचारी देवमाने यानी उडवा उडवीची उत्तरे दिली
त्यामुळे सर्व परिस्थिती बघता वालुर येथे स्वच्छ भारत अभियानाला खीळ बसली असुन अधळ दळतय अन कुत्र पिठ खातय अशीच परिस्थिती दिसुन येते
आहे तर यामध्ये मोठे गोळबंगाल असल्याचे दिसत आहे नसता एखाद्या कुटुंबातील एकाही व्याक्तीचे नाव नाहि तर एखाद्या कुटुंबातील चार चार पांच पाॅच नावे असल्याने आश्चर्य व्याक्त होत
तर हा संपुर्ण प्रकार दिवसा ढवळ्या गळत असल्याने विरोधी पक्षाचे सहा ग्रामपंचायत सदस्य असुन एकहि पुढे येत नाही त्यामुळे
सत्ताधारी आणि विरोधक संगनमताताने करीत आहे की काय असे येथील सर्व सामान्य नागरिक आत्ता बोलु लागले आहे
तेरी भी चुप मेरी भी चुप अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची लवकरात लवकर योग्य चौकशी करून वालुर येथील या योजनेपासुन वचिंत राहात असलेल्या गोरगरीब लोकांना न्याय मिळवून द्यावा तसेच
या योजनेत जी काहि अफरा तफर झाली असेल त्याची चौकशी करून संबंधितावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनाव्दारे गटविकासाधिकारी अधिकारी पंचायत समिती सेलु यानी वालुर येथील मौलाना अकरम कुरेशी यानी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें