वालुर प्रतिनिधी.दि.06/01/2020.
सेलु तालुक्यातील वलंगवाडी येथे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत
दर्पण दिन साजरा आज दिनांक 6 जानेवारी 2020 सोमवार रोजी सकाळी 11:00 वाजता सेलवाडी येथील नागरिकांच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंलगवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री प्रल्हादराव शेळके हे होते
तर प्रमुख पाहुणे म्हणून म्हणुन वालुर पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख बब्बू हे होते तर या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष श्री गजानन खिस्ते. सचिव अनवर पठाण. कार्यध्यक्ष बिलाल तांबोळी. सदस्य सोहेल तांबोळी सदस्य शेख मुसाभाई. तसेच बबलु बागवान. रिजवान पठाण. गणपत गंगाधर राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी बोलताना वालुर पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख बब्बू यानी बोलतांना म्हणाले की दर्पणकार बाळ शास्त्री जाभेकर यानी ब्रिटिश राजवटीत कठीण परिस्थितीत. सामान्य नागरिक तसेच दुलक्षीत. आत्यचारीत शोषित पिळीत लोकाचे प्रश्न शासना. पर्यत पोहोचण्यासाठी 1832 सालात ब्रिटिश राजवटीत दर्पण या.नावाने पहिले मराठी दैनिक बाळ शास्त्री जाभेकर सुरू केले होते त्यामुळे मराठी पत्रकारीतीने आज देशात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे असे मत यावेळी बोलताना वालुर पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख बब्बू यांचा यानी व्याक्ते केले यावेळी दगडोबा जोगदंड पाटील वंलगवाडीकर यानी आपले मनोगत व्याक्त करतांना सागीतले की आम्हाला नेहमीच पत्रकाराची साथ मिळाली असुन पत्रकाराच्या सहकार्याने गावातील अनेक समस्या प्रश्न सुण्यास मदत झालेली आहे असे सागीतले तर सेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी .व्हि सानप आणी गजानन खिस्ते यानीही आपले मनोगत व्यक्त केले
तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सचिन शहाणे यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळ शास्त्री जाभेकर याच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
त्यानंतर उपस्थिती सर्व पत्रकार आणी प्रमुख पाहुण्याचे पुष्प गुच्छ देऊन स्स्वागत करण्यात आले
या कार्यक्रमासाठी येथील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष 1) प्रल्हादराव शेळके 2 ) दगडोबा जोगदंड पाटील 3 ) ग्रामपंचायत सदस्य श्री. मानीकराव जोगदंड 4 ) सय्यद दादामीयाॅ 5 ) जिवाजी शेळके 6 ) नारायण लोखंडे 7 ) ज्ञानेश्वर शेळके 8 ) ऊत्तमराव जोगदंड 9 ) भगवान जोगदंड 10 ) लक्ष्मण शेळके सर्व रा. वलंगवाडी
आदिनी पुढाकार घेतला होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें