शांताबाई नखाते आश्रमशाळेत जिल्हाविज्ञान प्रदर्शनाचा समारोप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 31 दिसंबर 2019

शांताबाई नखाते आश्रमशाळेत जिल्हाविज्ञान प्रदर्शनाचा समारोप.

राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी आकरा प्रयोगाची निवड.

 बालवैज्ञानीक व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव .

संपादक=अनवर पठान.दि.31/12/2019.
                वालूर येथील शांताबाई नखाते आश्रमशाळेत दोन दिवसापासून सुरु असलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप ३१ डिसेंबर रोजी  करण्यात आला.याप्रसंगी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवडलेल्या आकरा प्रयोगाचे बालवैज्ञानीक व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  
           अध्यक्षस्थानी वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कृऊबास सभापती अनिलराव नखाते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प.चे अति मुख्यकार्यकारी अधिकारी विजय मुळीक,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ ,गटशिक्षणाधिकारी गणराज यरमाळ,विज्ञान पर्यवेक्षक जि.एस.मोरे ,मा.मा.सुर्वे , प्रशासकीय अधिकारी रमेश सरोदे ,अनिल थोरे,प्राचार्य रमेश नखाते,मुख्याध्यापक शाम मचाले यांची उपस्थीती होती.
               जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक ,माध्यमिक ,लोकसंख्या  शिक्षण ,शैक्षणिक सहित्य व प्रयोगशाळा सहाय्यक,परीचर गटामधुश ६७ असे प्रयोग शाश्वत पर्यावरणासाठी पुनर्वापराची संकल्पनेतुन सादरीकरणाने विज्ञानप्रेमी आकर्षित झाले या प्रदर्शनातुन ११ प्रयोगांनी बाजी मारली असून प्राथमिक गटात इंदिरा गांधी विद्यालय पुर्णा येथील प्रथमेश घुले च्या 'स्मार्ट होम ' आणि माध्यमिक गटात कै.रावसाहेब जामकर माध्यमिक विद्यालय परभणी येथील शेख सलमान च्या 'मिलिट्री रोबो प्रग्यान 'या प्रयोगांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.
             प्राथमिक गटामधुन द्वितीय ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी येथील शिवराजे गायकवाड चे 'वळण मार्गावरील अपघात नियंत्रण उपकरण' तर तृतीय क्रमांक खान अब्दुल गफार खान उर्दू विद्यालय पाथरी येथील इफत जहा शेख वहीद चे 'केबल ट्रान्सपोर्ट ' तर माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक ममता विद्यालय पाथरी येथील गौरव हाके चे  'सौर ऊर्जेचा दैनंदिन वापर ' तृतीय क्रमांक शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथील  जैद खान पठाण चे 'स्मार्ट सिटी' हे प्रयोग राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी पात्र ठरले आहेत.
विविध सामाजिक समस्यांवर विज्ञानाच्या साह्याने कशी मात करता येईल हे आपल्या प्रयोगातून भावी संशोधकांनी येथे  दाखवून दिले. 
                या प्रदर्शनात विज्ञान शिक्षकांनीही प्रात्यक्षिके सादर केले होते.शैक्षणिक प्राथमिक गटामधून जिल्हा परीषद शाळा आहेरवाडी  येथील गिते लक्ष्मण हणमंत यांचे ' विज्ञानजत्रा '  तर माध्यमिक गटातुन  शांताबाई नखाते माध्यमिक आश्रमशाळा वालूर येथील  प्राचार्य रमेश नखाते यांचे 'शैक्षणिक खेळ व गणीतीय उपकरणे ' हे शैक्षणिक साहित्य तर लोकसंख्या शिक्षण व पर्यावरण मधुन प्राथमिक गटातून जवारह प्राथमिक विद्यालय जिंतूर  येथील पी.एस.कणकदंडे यांचे पर्यावरण शिक्षण तर माध्यमिक गटामधुन जवाहर माध्यमिक विद्यालय जिंतुर येथील पी.जे.महाजन  यांचे  पर्यावरण शिक्षण व प्रयोगशाळा परीचर गटामधुन नुतन विद्यालय सेलू येथील महेश हजारे यांचे बहुउपयोगी शैक्षणिक साहित्य हे प्रयोग राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवडले आहेत.यशस्वी बालवैज्ञानीक व शिक्षकांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी गणराज यरमाळ यांनी केले तर सुत्रसंचालन रेवणअप्पा साळेगांवकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक शाम मचाले यांनी मानले.
                   या दोन दिवशीय प्रदर्शनात जिल्हा परीषद व खाजगी अशा ३८ शाळेतील २ हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली.  हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष अनिल नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले .

उत्कृष्ट नियोजणाच्या बोलक्या प्रतिक्रिया...
         प्रदर्शन मांडणी पासुन,भोजन,निवासासह सर्व नियोजन अतिउत्कृष्ट होते अशा प्रतिक्रिया समारोप कार्यक्रमात बालवैज्ञानिक शेख सलमान ,सुभाष शिलार,शिक्षक एल.एस.गिते,प्रल्हाद निर्मळ यांनी व्यक्त केल्या.
वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा...मुळीक
           या समारोप प्रसंगी जि.प.चे अति मुख्यकार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी प्रयत्नवाद हाच यशाचा यशस्वी मार्ग आहे .शास्वत पर्यावरणासाठी पुनरवापरायोग्य संसाधनांची नवकल्पना व गणीतीय वापराची सोपी पध्दत यासाठी  बालवैज्ञानिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी रूजवावा व ह्या  वैज्ञानिक संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून साकार कराव्यात असे सांगितले की प्रयत्नवाद हाच खरा यशाचा मार्ग आहे असे मुळीक यांनी  सांगीतले.


जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरासाठी निवड झालेल्या ११ प्रयोगाचे बालवैज्ञानिक व शिक्षक यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.याप्रसंगी संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते ,अति.मुख्यकार्यकारी अधिकारी विजय मुळीक,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ,गट शिक्षणाधिकारी गणराज यरमाळ, विज्ञान पर्यवेक्षक जी.एस.मोरे,मा.मा.सुर्वे ,रमेश नखाते, शाम मचाले,रेवणअप्पा साळेगांवकर आदी...


तेज़्ज़ऩ्युज़24 वेब चैनल बातम्या व जाहिरातीसाठि

संपर्क.मो.नं.8888375846 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें