प्रतिनिधी पाथरी:दि.20/12/2019.
कुल जमाती तंज़ीम पाथरी ( सर्व पक्षीय संघटन पाथरी) च्या वतीने आज शुक्रवारी CAA आणि NRC च्या विरोधात भव्य सर्व धर्मीय सर्व पक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला। मोर्चेचा आयोजन चौक बाज़ार पाथरी पासून ते जिल्हा परिषद मैदान पर्यंत करण्यात आला होता।हज़ारो सर्व धर्मीय सर्व पक्षीय नागरिकानीं या मोर्चेत सहभाग घेतला। अनेकांनी आपल्या हाथात भाजपा सरकारच्या संविधान विरोधी निर्णयाचे निषेध करणारे प्ले कार्ड्स धरले होते।
या मोरच्याला कुल जमाती संघटनेचे उपाध्यक्ष मो शफ़ी फ़ारूक़ी यानी प्रामुख्याने संबोधित केले.त्याच बरोबर रणवीर भाले पाटिल, प्रो. विकास पाथरीकर, मा आसिफ सर, मौलाना हारून साहब, मा विठ्ठल कदम, कामरेड ज्ञानेश्वर काळे, रेखा ताई मानेरे,मो शफ़ी फ़ारूक़ी, मंच चे अध्यक्ष हाफिज अब्दुल जब्बार इत्यादिनीं संबोधित केले।.......
सर्वांनी घोषणा केली की आम्ही पाथरीवासी CAA आणि NRC ला रिजेक्ट करीत आहोत। आणि आम्ही सर्व या विधेयकाचे बॉयकॉट करणार आहोत।तसेच जामिया मिल्लिया, अलीगढ़ यूनिवर्सिटी, लखनऊ, बंगलुरू च्या विद्यार्थियांवर झालेला हल्ल्यांचे निषेध करण्यात आले।
सर्व धर्म,जात, पक्षाच्या नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी या मोर्चेत सहभाग घेतला। कार्यक्रमाचे सूत्र संचलन नईम अंसारी यानी केले। कार्यक्रमा नंतर तहसीलदर याना मेमोरेंडम देण्यात आले।
मोर्चेस यशस्वी करण्यासाठी संघटन चे सर्व पदाधिकारी आणि पाथरी च्या युवकांनी सहकार्य केले।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें