एम.डी.ओ संघटनेचे पोलिस,महानिरीक्षकांना निवेदन.
परभणीत CAA मोर्चात काही युवकांकडून तोडफोड करण्यात आली परंतू पोलीसांच्या वतीने आरोपींच्या नावाखाली अल्पसंख्याकांच्या वसाहतीत रात्री-बेरात्री निष्पाप लहान मुले आणि वृद्ध लोकांवर धर पकड करुन गुन्हे दाखल कऱण्यात येत आहे पोलिसांच्या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईत निष्पाप लोकांवरील गुन्हे मागे घेऊन निष्पाप लोकांवरील सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन(MDO) संघटनेच्या वतीने पोलिस महानिरीक्षक कार्यालय नांदेड येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी एमडीओ संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें