चारठाणा. ( प्रभाकर कुऱ्हे )
चारठाणा.चारठाणा येथे एन.आर.सी.आणी सि.ए.ए.च्या विरोधात निषेध मुक मोर्चा काढुन केंद्र शासनाने मंजुर केलेला नागरीकत्व सुधारणा कायदा व नागरीकत्व नोंदणी कायदा रद्द करावा या मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.विशेष म्हणजे सदर मोर्चात गावातील सर्व समाजाचे नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चारठाणा येथील जामा मस्जिद ते हुतात्मा स्मारक परिसर पर्यंत सकाळी ११ वाजता मुकमोर्चा काढण्यात आला.सदर मोर्चाचे हुतात्मा स्मारक परिसरात विसर्जन करण्यात आले. यावेळी मौलाना फजलोद्दिन,मौलाना खुद्दुस,मौलाना गफार,नानासाहेब राऊत,अमोल भवरे,किरण देशमुख आदींनी मार्गदर्शन केले.प्रशासनाच्या वतीने जिंतुरचे नायब तहसीदार एच.आर.सोनवने व चारठाणा सज्जाचे तलाठी पवार यांनी निवेदन स्विकारले.सदर मोर्चात सय्यद अकबर अली,नानासाहेब राऊत,मधुकर भवाळे,किरण देशमुख,उपसरपंच तहेसीन देशमुख,सलीम काजी,असगर देशमुख,कासीम कुरेशी,सय्यद इम्रान,जलील इनामदार,सय्यद रहेमत अली,सय्यद खैसर,विष्णु वानखरे,नाना निकाळजे,अमोल भवरे,उमाजी निकाळजे,गेंदेखाँ पठाण,शेख सुलेमान, साबेर पठाण,बद्रोद्दीन काजी,हनुमंत चव्हाण ,कासीम इनामदार,सय्यद मुजाहेद,विजय रामपुकर,रेखा राठोड,वाजेद कुरेशी,बाबासाहेब मेहेत्रे,निसार देशमुख,लायक कुरेशी,नईमोद्दिन काजी,शेरखाँ पठाण,युसुफ पटेल,शेख रफीक,मुजीब मिर्झा,सय्यद मजहर अली,सय्यद तालेब अली,जुबेर मिर्झा,शेख खलील,विजय निकाळजे,सय्यद दाऊत अली,वसंता निकाळजे,मौलाना उमर, मौलाना मुबारक,मौलाना रिजवान,मौलाना अन्वर यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
व्यवहार सुरळीत !
सदर मुक मोर्चा दरम्यान बंद चे नियोजन वगळण्यात आल्याने गावातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते.दरम्यान सहाय्यक पोलीस निरिक्षक बळवंत जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अल्लापुरकर, बिट जमादार वाय.के.शेख,मंचक जाधव,इघारे,बुकरे,गाडेकर,गिराम,मोरे मॅडम आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें