औरंगाबाद (प्रतिनिधी) दि 5/12 शहरांमध्ये भेडसावत असलेल्या डेंग्यू आणि इतर साथीच्या रोगांचे निदान करण्यासाठी बीड बायपास येथील अबरार कॉलनीमध्ये विविध रोगांची तपासणी करून औषधी देण्यात आल्या
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन औरंगाबाद पश्चिम तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिर सकाळी ११:०० ते दुपारी ०१:०० वाजे दरम्यान पार पडले या शिबिराचा लाभ ३५० हून अधिक रुग्णांनी घेतला शिबिरामध्ये गोळ्या औषधी व्यतिरिक्त रक्ताच्या आणि इतर वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या महानगरपालिका स्वास्थ्य विभागाच्या डॉक्टरांनी तपासणी करून मोफत औषधी वितरित केल्या या शिबिराचे आयोजन साबेर पटेल यांनी केले होते या शिबिरास पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर गफ्फार कादरी, नगरसेवक शेख अहमद,नासेर सिद्दिकी,युवा जिल्हाध्यक्ष मुन्शी पटेल,शहराध्यक्ष समीर साजिद बिल्डर,युवानेते जावेद खान,अज़हर अफसर पठाण,आदींनी शिबिरास भेट दिली. इमरान बबलू,अनीस पटेल, हाजी अल्ताफ,तबरेज़ अहमद,सय्यद कादर,मोहम्मद असिफ,हाफ़िज़ जाकीर,नासेर पटेल,मुस्ताक पटेल, रफिक पटेल,
आदींनी शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें