औरंगाबाद (प्रतिनिधी)
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन औरंगाबाद मुख्य कार्यालय दारुस्सलाम येथे मागील आठ दिवसांपासून घाटी रुग्णालयात डायलिसीस मशिन बंद असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत होत्या खासदार ईम्तीयाज जलील यांच्या आदेशाने शहराध्यक्ष समीर साजिद बिल्डर व मुन्शी पटेल माजी जिल्हाध्यक्ष युवक यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय एम टीम औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी बारा वाजता घाटी रुग्णालयात वस्तुस्थिती पाहण्यासाठी डायलिसिस विभागात चौकशी केली असता किरकोळ लिकेजमुळे मागील आठ दिवसांपासून डायलिसीस मशिन बंद असून रुग्णांचे हाल होत असल्याचे लक्षात आले त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि पिआररोनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु काम साधे असून त्याचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर ठेकेदाराला पाचारण करण्यात आले आणि अवघ्या दीड तासात मशीन पूर्ववत सुरू करून घेण्यात आल्या हे सर्व प्रकरण संपत नाही तर प्रशासनाचा दुसरा भोंगळ कारभार पहावयास मिळाला घाटी रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक एक तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि रुग्णांचा आजार यामुळे त्रस्त असतात त्यातच त्यांची दुचाकी वाहने पोलिस प्रशासनाकडून उचलून नेण्याचे काम पहावयास मिळाले रुग्णाला तपासणीस आनल्यानंतर दुचाकी उभी करून दवाखान्यात जाणाऱ्या बाहेरगावच्या नातेवाईकांची त्यामुळे चांगलीच पंचाईत होते तर रुग्णांचा त्रास आणि त्यातच गाडी गायब झालेली पाहिल्यानंतर चांगलाच गोंधळ उडतो हे सर्व थांबावे यासाठी टीम एमआयएमने पोलिस प्रशासनास जाब विचारला असता त्यांनी घाटी रुग्णालय कडे बोट दाखवले त्यावर घाटी रुग्णालयाला निवेदन देऊन असे प्रकार पुन्हा घडू नये असे सांगण्यात आले याप्रसंगी समीर साजिद बिल्डर, मुंशी पटेल, वसीम खान ,जावेद खान, अनिस खान ,मतीन खान ,अजहर अफसर पठाण,शेख साबीर, रिजवान खान ,परवेज खान, इम्रान पठाण, सोहेल सिद्दिकी, भाई ईम्तीयाज, शकील पटेल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें