वालुरमध्ये जुगार अड्ड्यावर धाड: सतरा प्रतिष्ठित नागरिकावर गुन्हे दाखल: दोन लाख 75 हजाराच्या रोकड सह 32 लाखाचा ऐवज जप्त सेलू तालुक्यावर जिंतूर पोलीसांचा उतारा; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 दिसंबर 2019

वालुरमध्ये जुगार अड्ड्यावर धाड: सतरा प्रतिष्ठित नागरिकावर गुन्हे दाखल: दोन लाख 75 हजाराच्या रोकड सह 32 लाखाचा ऐवज जप्त सेलू तालुक्यावर जिंतूर पोलीसांचा उतारा;

प्रतिनिधी.दि.13/12/2019.
सेलू तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे तसेच अवैध वाळूचा उपसा होत आहे या सर्व अवैध धंद्यावर सेलू महसूल आणि सेलू पोलिसांचा वचक असायला हवा मात्र सेलू तालुक्यात चालणाऱ्या सर्व अवैध धंद्यावर जिंतूरचे प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक श्रावण दत्त त्यांची करडी नजर पडत आहे मात्र सेलू पोलीस झोपेचे सोंग घेत आहे का? त्याबद्दल त्यांना माहितीच नाही याबद्दल मात्र वालुर आणि सेलू परिसरात चर्चेला उधाण आलेले आहे त्यात गुरुवार दिनांक बारा डिसेंबर च्या रात्री साडे आठच्या दरम्यान वालुर येथील जुगार अड्ड्यावर जिंतूर चे डीवायएसपी यांनी धाड टाकून 17 जणांना रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत यात पावणेतीन लाखाच्या रोख रकमेसह 32 लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे


याबाबतचे वृत्त असे की गेल्या कित्येक दिवसापासून सेलू तालुक्यात पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाचा धाक उरलेला नाही रात्री-बेरात्री सर्रासपणे वाळूचे उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाळूची विक्री केली जाते तसेच तालुक्यात सर्वत्र अवैद्य दारू जुगार अड्डे यांनी अक्षरशहा उच्छाद मांडला आहे मात्र या सर्व गोष्टीकडे सेलूचे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करत आहेत याबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून ओरड होत आहे मात्र त्यातच जिंतूर येथील प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रावण दत्त हे देवाच्या रुपाने प्रकट झाले असून गेल्या दोन दिवसापासून त्यांनी स्वतः रात्रीच्या वेळी अवैध वाळूचा उपसा करून विक्रीला जात असलेल्या रेतीचे भरलेले चार ट्रॅक्टर्स पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तसेच गुरुवार दिनांक बारा डिसेंबर च्या रात्री साडेआठच्या दरम्यान वालुर येथील रवींद्र पन्नालाल कलाल यांच्या शेतात तथाकथित प्रतिष्ठित नागरिक यांना  झना मन्ना नावाचा जुगार खेळत होते याची माहिती कळताच जिंतूरचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी घटनास्थळी धाड टाकून दोन लक्ष 75 हजाराची रोकड सह बत्तीस लाखाचा ऐवज जप्त केला असून संबंधितावर सेलू पोलिस ठाण्यात कलम 345/19 अन्वय 12(अ)मू जुगार अड्डा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यावेळी जिंतूर मंठा वालूर परभणी पोखरणी मानवत आदी ठिकाणाहून तथाकथित प्रतिष्ठित जुगार खेळणे करता आलेले होते त्यात रमेश गिरधारीलाल जयस्वाल राजेभाऊ किशन बोराडे शेख जावेद शेख जयकुमार नंदलालजी राठी रमाकांत वट्टमवार निलेश जुगलकिशोर राठी शेख नजीर शेख कबीर शिवनारायण गंगाभीषण सारडा जावेद खान रुस्तम खान शहाजी शहा गुलाब शहा नामदेव आप्पाराव कणसे कैलास साहेबराव देशमुख सय्यद एफतेखार सय्यद हुसेन  संदीप पंडितराव भाबळे माणिक पंडितराव वाघ शंकर मुंजा तरटे मदन पापालाल आधी 17 जनावर गुन्हे दाखल
 करण्यात आलेले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें