आनंदेरो झाड' पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 25 नवंबर 2019

आनंदेरो झाड' पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

आबा महाजन यांच्या बालकुमार कवितांचा बंजारा बोली भाषेत जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी केलेला हा अनुवाद महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग  - मा.दिनकर गांगल, ग्रंथाली संस्थापक .

       
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी येथील विद्यार्थ्यांनी सुप्रसिद्ध बाल साहित्यिक आबा महाजन यांच्या बालकुमार कवितांचं बंजारा बोलीतअनुवादित केलेलं  युवराज माने यांचं संपादित पुस्तक 'आनंदेरो झाड' हे पुस्तक काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे  शिक्षण विकास मंच आयोजित दहाव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत ग्रंथालीचे संस्थापक तथा महाराष्ट्र थिंक डॉट कॉमचे प्रमुख माननीय दिनकर गांगल, बाल साहित्यिक राजीव तांबे , किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, वयम मासिकाच्या संपादिका शुभदा चोकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ तथा शिक्षण विकासमंचचे मुख्य संयोजक डॉक्टर वसंत काळपांडे ,मुख्य सल्लागार माननीय बसंती रॉय, मेंदूच्या अभ्यासिका श्रुती पानसे, गीतांजली देवगावकर,प्रसिद्ध साहित्यिक नरेंद्र लांजेवार विजय जोशी, माधव सूर्यवंशी, अजय पाटील, प्रकाश पाटील,आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं.
       याप्रसंगी माननीय दिनकर गांगल यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी येथील विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक केलं . आनंदाच्या झाडातील राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांच सोशल माध्यमाच्याद्वारे मी दररोज अवलोकन करतो. युवराज माने यांनी सोशल माध्यमाचा अतिशय योग्य वापर केलेला आहे. त्यांच्या शाळेत राबविले जाणारे वेगवेगळे उपक्रम मागील बऱ्याच वर्षापासून मी पाहत आलो आहे.आबा महाजन यांच्या बाल साहित्याचा अभ्यास करून आपल्या स्वतःच्या बोलीभाषेत कवितांचा अनुवादन करणे व ते इतरांसाठी उपलब्ध करून देणे ही साहित्यातील जमेची बाजू आहे . असे अनेक बोलीभाषेतील प्रयोग झाले पाहिजेत.आज या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हातून होत असताना मला फार आनंद होत आहे .महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असेल असेही ते याप्रसंगी म्हणाले. विचार मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांनी बालसाहित्यातील या प्रयोगाचं भरभरून कौतुक केलं.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें