पुणे:योगेश मोरे यांनी युनिवर्सल बायो कॉन प्रा.लि. इंडस्ट्रीला दिली भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 28 सितंबर 2019

पुणे:योगेश मोरे यांनी युनिवर्सल बायो कॉन प्रा.लि. इंडस्ट्रीला दिली भेट.


औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील प्रसिद्ध मराठी साहित्यिक,गीतकार,संगीतकार,कथा पटकथा लेखक तथा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश मोरे यांनी पुणे येथील युनिव्हर्सल बायो कॉन प्रायव्हेट लि.पुणे या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.विश्वास विठ्ठल सोंडकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली.श्री.सोंडकर म्हणाले की, युनिव्हर्सल बायो कॉन प्रा.लि.या जैविक शेतीविषयक कंपनीची स्थापना 14 वर्षांपूर्वी मुळशी तालुक्यातील हिंजेवाडी येथे झालेली आहे.आमची इंडस्ट्री शेतीविषयक फवारणीचे जैविक औषधी,जैविक खते,दुय्यम अन्नद्रव्ये,जैविक कीटकनाशके आदी जैविक उत्पादने शेतकऱ्यांना अत्यल्प दरात संपूर्ण महाराष्ट्रात देत आहे.तसेच शेतकरी रासायनिक खतांचा व औषधांचा अतिवापर करीत असल्यामुळे जमिनी नापीक होत चालल्या आहेत,शेतकऱ्यांनी जैविक शेती करावी आणि भरघोस उत्पन्न घ्यावे आणि देशाला सुजलाम सुफलाम करावे,अशी माहिती त्यांनी योगेश मोरे यांना दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें