राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 सितंबर 2019

राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा.

मुंबई:  काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. अजित पवारांनी कोणतंही कारण न देता राजीनामा दिला आहे. अजित पवार यांचा राजीनामा मंजूर केल्याचे बागडे यांनी सांगितले. “माझ्या विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा मी देत आहे असा फोन अजित पवार यांनी स्वतःहून मला केला म्हणून मी तो मंजूर केला असं बागडे यांनी सांगितले.” तसेच कुठलंही कारण त्यांनी दिलेलं नाही असंही ते म्हणाले.

अजित पवार यांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुढे आलं होतं. त्यांच्यासह ७० जणांची नावं २५ हजार कोटींच्या घोटाळ्यात समोर आली होती. ज्यामध्ये शरद पवार यांचंही नाव होतं. आज दिवसभर शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार ही बातमी चर्चेत होती. मात्र कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगत शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. अजित पवार हे त्या शिखर बँकेच्या संचालक मंडळावर होते. या घोटाळ्यामध्ये शरद पवारांचा संबंध असू शकत नाही कारण ते ना संचालक होते, ना सभासद होते असे सर्वांनीच स्पष्ट केले होते. मात्र कुणीही अजित पवार  यांच्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले नव्हते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें