उद्या परभणी जिल्हा बंदचे रा.काँ.जिल्हाअध्यक्ष आ. दुर्रांनींचे आवाहन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 25 सितंबर 2019

उद्या परभणी जिल्हा बंदचे रा.काँ.जिल्हाअध्यक्ष आ. दुर्रांनींचे आवाहन.

प्रतिनिधी.दि.25/09/2019.
पाथरी:-महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथीत गैरव्यवहारात शरदचंद्र पवार साहेब यांचा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नसताना केवळ सदरील गैरव्यवहारात आरोप असलेल्या व्यक्ती ह्या खा पवार साहेबांच्या विचारांचा आहेत, एवढ्या तुटपुंज्या कारणावरून व कोणता ही सबळ पुरावा नसताना खा पवार साहेबां विरुद्ध खोटा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या चा निषेध करत परभणी जिल्हाबंद  ची हाक  राकाँ जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रानी यांनी दिली आहे.

फेसबुकवर केलेल्या पोष्टमध्ये आ दुर्रानी म्हणतात की मागील पाच वर्षे कोणतीही कारवाई न करता विधानसभा निवडणुकीच्या काळात सदरील खोटा गुन्हा नोंदवुन आदरनिय पवार साहेबांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे. या सर्व प्रकरणी "ईडी" व इतर यंत्रणांचा सोयीप्रमाणे वापर करून दडपशाहीचा मार्ग अवलंबण्याचा प्रकार सुरू आहे, त्यातूनच असे खोटे गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. याचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी परभणी जिल्हा तीव्र विरोध करत आहे.

माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विरुद्ध नोंदविण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ उद्या दिनांक 26 सप्टेंबर 2019 रोजी परभणी शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा बंद ठेवून जिल्हा बंद करण्यात येत असून वरील दडपशाहीचा निषेध नोंदवण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील तमाम साहेबप्रेमींनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राकाँ जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी फेसबुक पोष्टच्या माध्यमातून केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें