साईभक्तासाठी खुशखबर : मुंबई - शिर्डी प्रवास अवघ्या तीन तासात - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 10 जुलाई 2019

साईभक्तासाठी खुशखबर : मुंबई - शिर्डी प्रवास अवघ्या तीन तासात


शिर्डी प्रतिनिधी
कु. किरण जाधव.

मुंबई ते शिर्डी दरम्यान लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याने मुंबईकरांना अवघ्या तीन तासात शिर्डी दर्शनासाठी दाखल होता येणार आहे.
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे भक्ताचा वेळाखाऊ आणि कंटाळवाणा प्रवास टळणार असुन एकाच दिवसात साईबाबांचे दर्शन घेऊन मुंबईत परत जाण्याची सुविधा वाढणार आहे.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात  दर्शनासाठी देशभरातून गर्दी असते.त्याचप्रमाणे मुंबई मधुन येणार्या साईभक्ताची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई ते शिर्डी दरम्यान रेल्वे मार्गावर अठरा रेल्वे गाड्या धावत आहेत.
यापैकी काही गाड्या दौंड पुणे मार्गावरून तर काही नाशिकरोड - मनमाड मार्गावरून धावत आहेत. परंतु या गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी ९-१० तास लागतात.
यामुळे मुंबई वरून येणार्या भक्ताना दोन दिवस असा कालावधी काढावा लागतो.
वंदे भारत एक्स्प्रेस मेट्रो ट्रेन च्या धरतीवर असुन या गाडीला १६ डब्बे आहेत.एक्सप्रेस मेट्रो ट्रेन मध्ये एकुण ११२८ प्रवाशांसाठी आसन व्यवस्था केली असून भाविकांना मुंबई-शिर्डी- मुंबई असा प्रवास एका दिवसात शक्य होणार असल्याने साई भक्ताच्या गर्दीत वाढ होणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें