लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांना वाटण्यात आली पुस्तके.
मागील सत्रात परीक्षा संपल्यानंतर मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली. या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यासाठी दिली होती. त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पुस्तक गहाळ केली तर काही जणांनी वापरताना त्यावर लिखाण काम, त्यांचे कव्हर व्यवस्थित न ठेवणे अशा वेगवेगळ्या कृती केल्या. मात्र त्यापैकी काजल राधा ,शिवानी ,रेणुका ,नेहा, अजय पवार, अजय प्रकाश राठोड, अजय संजय राठोड, रेश्मा आडे, ओम आडे, मनीषा राठोड, निकिता राठोड या12 विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम पणे पुस्तक हाताळली. त्याच सोबत वाचलेल्या पुस्तकांचा सारांश स्वरूपात वेगळ्या वहीमध्ये नोंदी केल्या. पुस्तक वाचन व माझ्या शाळेतील वेगवेगळ्या उपक्रमावर अतिशय चिकित्सकपणे नजर ठेवून असणारे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय गजानन थतेसरांनी या संदर्भात उत्तम पुस्तक हाताळणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच काही पुस्तके भेट पाठवून देतो असा शब्द दिला आणि त्यांनी शाळा सुरू झाल्याबरोबर दोन पार्सलमधून या बारा विद्यार्थ्यांना त्यांच्या संग्रहातील दुर्मिळ पुस्तकांची भेट पाठवली.*
*या बारा विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी आमच्याकडे आठवा वर्ग उपलब्ध नसल्यामुळे इतर शाळांमध्ये प्रवेशित झाली. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक देण्यास विलंब झाला .मात्र काल माझ्या वाढदिवसानिमित्ताने यातील बरेच विद्यार्थी उपस्थित होते. माननीय गजानन थत्ते यांनी पुस्तक लॉटरी पद्धतीने देण्यात यावी या संदर्भात सूचना केल्या होत्या. एवढेच नाही तर त्यांनी लॉटरी पद्धतीची तिकीट सुद्धा व्यवस्थित करून आम्हाला पार्सलमध्ये पाठवली होती. त्यानुसार काल माननीय डिक्कर सर यांच्या अध्यक्षतेखाली या विद्यार्थ्यांचे लॉटरी पद्धतीने पुस्तक वाटप करण्यात आली. हा अनुभव माझ्यासह माझ्या सर्व चिमुकल्यांना अनोखा होता .सरांनी पाठवलेली त्यांच्या संग्रहातील अप्रतिम पुस्तक पाहून माझ्या चिमुकल्यांचे व माझे डोळे दिपून गेले.*
*यातील बहुतांश पुस्तके हे इंग्लिशमध्ये होती. माननीय गजानन थत्ते यांचा नेहमीच कल आम्हाला पाहायला मिळाला आहे की "आपण इंग्रजी वाचनाकडे वळलं पाहिजे ." त्यानुसार बहुतांश पाठवलेली पुस्तके ही त्यांची इंग्रजी माध्यमाचीच आहेत. मात्र लहान मुलांना सहज समजतील अशा मोठ्या अक्षरांमध्ये व चित्रासह पुस्तक असल्यामुळे मुलांना सहजरित्या ते आवडतात. अतिशय आनंदी वातावरणामध्ये या पुस्तकांचे वाटप करण्यात आलं .याप्रसंगी अजय प्रकाश राठोड याचे वडील व काका उपस्थित होते त्यांनाही या पद्धतीचं फार आश्चर्य वाटलं आणि त्यांनी गजानन त्यांचे आभार मानले. शाळेच्या मुख्याध्यापक यांच्यावतीने व माझ्या सर्व चिमुकल्यांच्या वतीने माननीय गजानन थते यांचे आम्ही सदैव ऋणी असू....*
*पुस्तकांचे वेड लावणारा ,पुस्तकांवर प्रेम करणारा, व माहितीचा खजिना सातत्यानं थोडा थोडा करून पाठवणारा एक उत्तम ज्ञानाचा झरा माननीय गजानन थत्ते यांच्या स्वरूपात मला व माझ्या चिमुकल्यांना मिळाल्यामुळे आम्ही सर्वजण फार श्रीमंत झालो असं मला वाटतं*
युवराज माने
आनंदाचं झाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी, ालुका सेलू ,जिल्हा परभणी.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें