गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीत अतिक्रमण मोहीम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 10 जुलाई 2019

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीत अतिक्रमण मोहीम.


शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीत होणार्या संभव्य गर्दीचा अंदाज घेऊन शिर्डी शहरातील अतिक्रमणावर कारवाई होत असल्याने व्यावसायिकांची धांदल  उडाल्याची ही बातमी.
शिर्डी पोलिस स्टेशन, शिर्डी नगरपंचायत, वाहतूक कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमणे काढण्यात येत आहे.
गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईबाबा मंदिराच्या सभोवतालची दुकाने आणि रस्त्यावर असलेल्या स्टाॅलवर रस्त्यावर असलेले फलक कर्मचार्यांनी काढून ताब्यात घेतले आहेत. तर ही मोहीम सुरूच राहणार असून  नियमांचा कोणी भंग केला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या अतिक्रमण मोहीमेत साईमंदिर परिसर कानिफनाथ मंदिर ते गेट क्रमांक ४ समोरील द्वारकामाई रोड येथील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली असून इतर ठिकाणी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमा उत्सव काळात गर्दीचे नियोजन आणि भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी अतिक्रमण धारकावर ही संयुक्त कारवाई केली जात आहे.
या कारवाईचा व्यावसायिकांनी धस्का घेतला असून अतिक्रमण धारक व्यावसायिक स्वत: होऊन दुकाने,स्टाॅल काढून घेत असल्याचे चित्र सध्या शिर्डी शहरात दिसत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें