मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१३: मानवत शहरातील पेट्रोल पंप दोन दिवसापासुन पंपातील मोटारीत ताञीक बिघाडामुळे बंद असल्याने दुचाकि वाहन धारकाचे फार हाल होत आहे.
मानवत शहरात एकच पेट्रोल पंप असल्यामुळे व वाहनाची संख्या शहरासह ग्रामीण भागातील मोठ्याप्रमाणात असल्यामुळे येथील पेट्रोल पंपावर दुचाकि वाहन धारक मोठ्याप्रमाणात पेट्रोल टाकण्यासाठी वाहन घेऊन येत असतात परंतु दि.१२ जुलैरोजी पासुन संध्याकाळी ६ वाजल्यापासुन पेट्रोल पंपावरील टँक मधील मोटारीत बिघाड झाल्यामुळे पेट्रोल पंप दोन दिवसापासुन बंद आहे अजुन केव्हा सुरु
होईल याची पण खाञी नसल्यामुळे दुचाकि धारकाचे फार हाल होताना दिसत आहे काहि वाहन धारकांना तर आपले वाहन हातात घेऊन परत जाण्याची वेळ आल्याचे यावेळी दिसले मानवत शहरातील व्याप्ती व लोकसख्या बघता मानवत शहरासाठी अजुन एक पेट्रोल पंप व्हावे अशी मागणी जनतेतुन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें