सेलू प्रतिनिधी
सेलू नगर परिषदेतील 24 नगरसेवकांपैकी नऊ असंतुष्ट नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डात विविध विकास कामे होत नसल्याची कारणे देत नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यावर कुरघोडी करण्याकरिता तसेच त्यांच्यावर दबाव निर्माण होण्याकरिता सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आल्याचे दाखवून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे
नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या कार्यकाळातील अडीच वर्षाचा कालावधी संपलेला आहे या अडीच वर्षाच्या कालावधीत विनोद बोराडे यांनी शहरात विविध विकास कामांचा धडाका लावलेला आहे मात्र या कालावधीत सर्व सदस्यांना त्यांच्या मनाजोगी कामे करण्याची मुभा दिलेली नाही तसेच त्यांच्या कार्यकाळातील अर्धा कार्यकाळ संपलेला आहे तसेच उर्वरित कालावधीत नगराध्यक्ष वर आपला दबाव राहावा तसेच विकास कामातील काही हिस्सा आपल्यालाही मिळावा या हेतूने सेलू नगरपालिकेतील शिवसेनेचे काही काँग्रेसचे - राष्ट्रवादी व अपक्ष आणि विनोद बोराडे यांच्या गटातील एक अशा 9 नगरसेवकांनी एकत्र येत सेलू नपचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन आपला निरोप नगराध्यक्ष पर्यंत पाऊस पोहोचवला असल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे वास्तविक पाहता या असंतुष्ट नगरसेवकांना आपला हिस्सा मिळत नसावा म्हणून त्यांनी वेगळ्या मार्गाने जाऊन नगराध्यक्षा वर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला असावा यापैकी काही नगरसेविकेच्या पतींना नगराध्यक्ष यांनी फ्लावर घेतात त्यांनी परत माघार घेतली असल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे त्यामुळे उर्वरित नऊ नगरसेवकांची मजल कुठपर्यंत जाते ते पाहणे योग्य ठरेल या नगरसेवकांचा मूळ उद्देश काय आहे हे सर्वांना ठाऊकच आहे मात्र त्याच्या आडून वेगळ्या मार्गाने विविध विकासकामांबाबत माहिती मिळत नसल्याचे कारण पुढे करत आहेत
येत्या दोन-तीन महिन्यात विधानसभेची निवडणूक लागणार असून या निवडणुकीकरिता आपापल्या गटामार्फत प्रयत्नशील असून आपण केलेली तसेच करणार असल्याचे विविध विकास कामे याबाबत जागरूकता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत मात्र यापैकी एकही नगरसेवक अत्यावशक कामे करण्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे एक प्रकारे नगराध्यक्षा वर अविश्वास ठराव सारखाच हा प्रकार असून याबाबत मोठ्या चवीने चर्चा करण्यात येत आहे या पाठीमागील खरे गौडबंगाल काय आहे हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें