सिल्लोड (प्रतिनिधी)दि 09/07/2019.
सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कार्यकारीनीची नुकतीच बिनविरोध निवड पार पडली असुन येथील उपसरपंच सांडु पाटील लोखंडे यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी कंवरसिंग चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी डि.बी.परदेशी व बि.डी.कुंभारे, सचिव बि. के.आव्हाळे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
संचालक मंडळ पुढीलप्रमाणे -- मंदाबाई प्रकाश साबळे, सविताबाई संतोष लोखंडे, संगीताबाई भारत दौड, प्रकाश गाडेकर,शंकर नरवाडे, शेख सुल्तान शेख रब्बानी, सुखदेव ढेपले,महम्मद अली सय्यद कासम, रामराव बडक, भागचंद माहोर, महादु नरवाडे,
यावेळी देविदास लोखंडे, गोविंदा लोखंडे, गजानन मिरगे, पंडित नरवाडे, हरिभाऊ कळवञे, अनिल लोखंडे, सय्यद एकबाल, संजय चव्हाण, हरेश्वर माहोर, शिवाजी गव्हाणे, प्रभाकर चोरमारे, शंकर समिंद्रे,मनवर तडवी, ज्ञानेश्वर माहोर, आदिंसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें