स्मार्टकार्ड योजनेसाठी सोनपेठ बसस्थानक येथे नोंदणी केंद्र सुरू करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 जुलाई 2019

स्मार्टकार्ड योजनेसाठी सोनपेठ बसस्थानक येथे नोंदणी केंद्र सुरू करण्याची मागणी.

जेष्ठ नागरीकांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन.


सोनपेठ मंजूर मूल्ला /                
एसटी महामंडळातर्फे मिळणाऱ्या स्मार्टकार्ड’ हे सोनपेठ येथिल बसस्थानकांंत  नाव नोंदणी करून वाटप करण्याची सोनपेठ जेष्ठनागरीकांची परिवहन महामंडळ परभणी मार्फत महाराष्ट्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कडे मागणी.                                       .                                                                                                            .                                                                                             .राज्य सरकारने जेष्ठनागरीकांनसाठी एसटी मधुन प्रवास करण्यासाठी सवलत देण्यात आली परंतु काही  लोकांनी बनावट कार्ड वापरून अनेकजण या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्याने परिवहन मंत्री व एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून एसटी महामंडळाने स्मार्टकार्ड धारकांना आधार क्रमांकाशी निगडित असलेली स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच आगारातून ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याचा योजनेचा शुभारंभही झाला. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अंगठ्याचा ठसा स्क्यानरवर ठेऊन आधार कार्डशी संलग्न माहिती प्राप्त झाल्यानंतर नाव नोंदणी करता येते. पंधरा दिवसांनी नोंदणी केलेल्या ठिकाणी कार्ड प्राप्त होईल. आगारातील आरक्षण खिडकीवर नागरिकांनी नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी करीत असताना स्मार्ट कार्डसाठी ५५ रुपये इतके शुल्क घेण्यात येत असून त्यानंतर तयार स्मार्ट कार्ड त्यांना देण्यात येणार आहे.
सोनपेठ तालूक्यासाठी सदरील स्मार्टकार्ड मिळण्यासाठी परळी वैजनाथ, पाथरी अथवा गंगाखेड येथे जाऊन नोंदणी करावी लागत आहे. यामुळे ज्येष्ठनागरीकांनी आर्थिक नुकसान व  मानसीक ञास सहन करावा लागत असुन शेतकरी, वारकरी यांना तास न तास ताठकळत रांगेत उभे रहावे लागत आहे.   स्मार्टकार्ड   मिळण्यासाठी सोनपेठ बस स्थानक येथे तात्काळ  नोंदणी केंद्र सुरू करावे अशी मागणी  तालुक्यातील  ज्येष्ठ नागरीकांनी सोनपेठ वाहतूक नियञंका मार्फत विभागीय नियंत्रक परभणी  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना  एका निवेदना द्वारे केली आहे,
या निवेदनावर माजी नगरसेवक पांडुरंग कदम, सीताराम खेडकर, बालमुकुंद सारडा, घन:श्यामदास झंवर, बालाप्रसाद मुंदडा, शैलेश महाजन,सुर्यकांत डाके, अरुण बसेट, रामराव कुलकर्णी, गंगाधरराव बागल, सुरेश टाक, मधुकर देशपांडे, शेख इब्राहिम, दत्तराव यादव, मारोतराव लांडे, भागवत बोबडे, बालाजी डमढेरे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें