अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ 11138तर्फे विद्यार्थी-शिक्षकांच्या प्रलंबित समस्या बाबत शिक्षक दरबारीत निवेदन सादर! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 13 जुलाई 2019

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ 11138तर्फे विद्यार्थी-शिक्षकांच्या प्रलंबित समस्या बाबत शिक्षक दरबारीत निवेदन सादर!

हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेब आणि शिक्षणाधिकारी डॉ. बी बी चव्हाण साहेब यांचा शिक्षक दरबारीत सत्कार !


औरंगाबाद- आज औरंगाबादेत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ रजिस्टर्ड 11138 चे राज्य कार्याध्यक्ष तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे राज्याध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी आज औरंगाबादेत आयोजित शिक्षक दरबार मध्ये  शिक्षकांचे लढवय्ये आमदार मा. विक्रमजी काळे साहेब व माध्यमिक चे कर्तव्यदक्ष शिक्षणअधिकारी मा. डॉ. बी बी चव्हाण साहेब यांचा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या परंपरा नुसार पुष्पगुच्छ ना देता पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले व त्यांना विद्यार्थी-शिक्षक आणि शाळांच्या समस्ये बाबत एक एक निवेदन सादर करण्यात आले व त्यावर सविस्तर चर्चा ही करण्यात आली. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ रजिस्टर्ड 11138 तर्फे देण्यात आलेले निवेदनात औरंगाबाद जिल्ह्यातील उर्दू मराठी जिल्हा परिषद च्या जे शाळा सामायिक चालते त्या उर्दू जिल्हा परिषद शाळानं स्वतंत्र यु डायस देण्यात यावे जेणेकरून होणाऱ्या विद्यार्थी-शिक्षकांचे नुकसान टाळावे,_ तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील खुलदाबाद तालुक्यातील कसाबखेडा उर्दू जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत त्वरित तात्पुरत्या रीतीने किंवा पुर्णतः कमीत कमी २ शिक्षक द्यावे जेणेकरून विद्यार्थी चे होणारे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना 2 ते 3 वर्षांपासून रखडलेली आहे या योजनेचा प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी येणाऱ्या सर्व आडीअडचणी सोडवून सर्व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती  मिळावी तसेच विद्यार्थी-शिक्षक हितार्थ औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा च्या इमारतीचा ऑडिट करण्यात यावे जेणेकरून भविष्यात काही जीवित हानी चे नुकसान होऊ नये.अश्या अनेक प्रलंबित मांगण्याचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी उपशिक्षणधिकारी माध्यमिक प्रिया राणी पाटील मॅम, नवनियुक्त उपशिक्षणधिकारी माध्यमिक सोळुंके साहेब प्राथमिक चे वेतन पथक अधीक्षक जेऊळकर सर ,माध्यमिक वेतन पथक चे बाळासाहेब पवार सर आदींची उपस्थिती होती.अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ चे राज्य कार्याध्यक्ष तथा हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन चे राज्याध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी आमदार साहेब ,तसेच  सर्व सन्माननीय अधिकारी वर्गाचे आभार मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें