सोमवार (दि 15) रोजी आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेत पंचायत समिती आमसभेचे आयोजन; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 13 जुलाई 2019

सोमवार (दि 15) रोजी आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेत पंचायत समिती आमसभेचे आयोजन;


सिल्लोड (प्रतिनिधी) दि 13/07/2019.
सिल्लोड पंचायत समिती सन 2018 - 19 व 2019 - 20 च्या वार्षिक आमसभेचे आयोजन सोमवार (दि 15) रोजी माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11:00 वाजता सिल्लोड शहरातील शेवंताबाई मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे.
बैठकीत मागील सभेच्या कार्यवृत्तांतासह 2018 - 2019 च्या योजनांवर कामांचा प्रगती आढावा घेणे तसेच 2019 - 20 या वर्षात घ्यावयाची कामे व रुपरेषा ठरविणे तसेच तालुक्यात झालेल्या विकास कामांवर चर्चा करण्यात येणार असुन शेतकरी - शेतमजुर नागरिकांच्या विविध अडी अडचणींसंदर्भातही चर्चा करण्यात येणार आहे.
आमसभेत सिल्लोड तालुक्यातील नागरिकांच्या विद्यूत महावितरण - तहसिल कार्यालय - पंचायत समिती कार्यालयासह इतर कार्यालयातील अधिकारी -
कर्मचा-यांकडून शेतकरी - शेतमजुर - नागरिकांची होत असलेली आर्थिक अडवणुक पिळवणूक - हेळसांड - अशा विविध समस्यांसह प्रलंबित असलेले प्रश्न सामंजस्याने सोडवण्यासाठी नागरिकांनी पंचायत समिती वार्षिक आमसभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
सिल्लोड तालुक्यातील संबंधित अधिकारी,ग्रामसेवक - तलाठी -- कर्मचारी,पदाधिकारी,सरपंच - उपसरपंच नागरिकांनी आमसभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें