सिल्लोड(प्रतिनिधी )दि. 10/07/2019.
सिल्लोड - सोयगांव तालुक्यातील हज यात्रेसाठी
जाणा-या सर्व हज याञेकरुंना बुधवार (दि 10) रोजी उर्दू डी एड कॉलेज भोकरदन रोड सिल्लोड येथे टीकाकरण (लसीकरण) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टिकाकरण - लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हज कमिटी अध्यक्ष हाजी भिकन खान, रुग्ण कल्याण समिती सदस्य हाजी मोहम्मद हनिफ, अब्दुल गफ्फार (मजुर फेडरेशन सोसायटीचे चेअरमन), नगरसेवक सलिम हुसैन , रऊफ बागवान, मतीन देशमुख, आसिफ बागवान, आरेफ पठाण,मुश्ताक बापु देशमुख, जुम्माखा पठाण,शेख बाबर, चांद मिर्झा, नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी रईस खान, डाँ.बि.एन.मोरे,डाँ.संजय मगर,अ.कदिर खान, एस.के.सुस्ते,ए.बी.जरारे,एस.पी.शिंदे,लता परदेशी,ममता परदेशी,ज्योती काकडे,रेखा डाखोरकर, अकिल देशमुख, फईम पठाण, आदिंसह हज याञेस जाणा-या याञेकरुंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें