सेलू प्रतिनिधी
सेलू नगर परिषदेतील बहुचर्चित पी टी आर वसुलीतील अपहार भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी परभणी कार्यालयाकडून सुरू करण्यात आली असून त्या आशयाचे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी कार्यालय परभणी यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद सेलू यांना दिले आहे
सेलू येथील नगर परिषदेतील पीटीआर वसुली विभागात सन 2017 -18 आणि 2018 -19 या दोन वर्षात लक्षावधी रुपयांचा अपहार भ्रष्टाचार करण्यात आला असून या प्रकरणाबाबत दिलीप डासाळकर यांनी 19 जून 2019 रोजी जिल्हाधिकारी परभणी यांचेकडे तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी 24 जून रोजी मुख्याधिकारी सेलू यांच्या नावे हे पत्र काढले असून सदरील पत्रात असे नमूद केले आहे की उपरोक्त दोन वर्षात सेलू येथील सामान्य नागरिकांना ज्या पीटीआर वाटप करण्यात आल्या त्या पिटीआर ची फीस प्रत्येकी 2100 असून अशा जवळपास 300 पेक्षा जास्त पीटीआर वाटप करण्यात आल्या असून त्याची सर्वच्या सर्व रक्कम संबंधित कर्मचाऱ्याने हडप केलेली आहे सदरील रक्कम ही नगर परिषदेत भरावयास हवी मात्र ती रक्कम नगर परिषदेत भरली नाही मात्र तरीही याबाबत ऑडीटमध्ये अथवा नगरपरिषदेच्या हिशोबात अद्याप पर्यंत कशी आली नाही हा प्रश्न निर्माण होतो
संबंधित कालावधीत मोहम्मद युनुस इकबाल या शिपायाकडे तसेच मोहम्मद आयुब अमिनुद्दिन यांच्याकडे होता याबाबतची तात्काळ चौकशी करून शासकीय रकमेचा अपहार भ्रष्टाचार केलेल्या कर्मचाऱ्याकडून सदरील रकमेची वसुली करण्यात यावी तसेच संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या प्रकरणाबाबत आपला स्वयंस्पष्ट अहवाल आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह या कार्यालयास सादर करावा असे दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलेली आहे
जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांचेकडून सदरील पत्र मुख्याधिकारी सेलू यांना दिलेले आहे मात्र या प्रकरणाचा अहवाल मुख्याधिकारी यांनी एक महिन्याच्या आत जिल्हाधिकारी यांना देणे गरजेचे आहे कारण सदरील प्रकरणातील एक कर्मचारी हा 31 जुलै रोजी निवृत्त होत आहे त्याच्या निवृत्तीच्या अगोदर अहवाल देणे मुख्याधिकारी यांच्यासमोर आव्हान असून ते पेलतात काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें