गुरुवार दिनांक 27 जून रोजी तहसील कार्यालय शेतकरी मेळाव्याचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 26 जून 2019

गुरुवार दिनांक 27 जून रोजी तहसील कार्यालय शेतकरी मेळाव्याचे आयोजन.

 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.


सेलू प्रतिनिधी

सेलू तालुक्यातील पात्र परंतु वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज सुलभ रीतीने मिळण्याकरिता येथील तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात सेलू शहरातील सर्व बँकांचे अधिकारी तसेच शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सेलू तहसीलदार यांनी केले आहे


सेलू तालुक्यातील खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पिक कर्ज घेताना कुठल्या अडचणी येतात व पात्र असलेले शेतकरी यांना याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता सेलू तालुका तसेच शहरातील सर्व बँकांना निर्देश दिलेले असून पीक कर्ज वाटप करण्याकरिता शेतकऱ्यांना सुलभता यावी याकरिता गुरुवार दिनांक 27 जून 2019 रोजी सेलू येथील तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे


विभागीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार 14 जून रोजी घेतलेल्या बैठकीत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळवण्याकरिता कुठलीही अडचण येऊ नये याकरिता तालुकास्तरावर जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन करण्याचे ठरवले आहे त्यानुसार सदरील मेळावा आयोजित केला असून या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेलूचे तहसीलदार असणार आहेत तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आलेली आहे या बैठकीस तालुका कृषी अधिकारी सर्व बॅंकांचे व्यवस्थापक गटविकास अधिकारी सर्व बँकांचे लोन अधिकारी उपस्थित राहणार आहेत याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें