सेलू प्रतिनिधी.दि.27/06/2019.
सेलू येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप डासाळकर यांना काही गुंडांनी पाथरी रोड वर सायंकाळी मारहाण केली यावेळी त्या गुंडांनी त्यांच्या डोळ्यावरील चष्मा काढून मारहाण केली तसेच या मारहाणीत त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये घेऊन त्या गुंडांनी पोबारा केला
याबाबतचे वृत्त असे की पत्रकार दिलीप डासाळकर हे सायंकाळी 7 50 च्या दरम्यान घराकडून गावात येते वेळी दोन मोटर सायकल स्वरांनी पाथरी रोड वरील डॉक्टर बाळासाहेब जाधव यांच्या दवाखान्यासमोर तसेच बजाज शोरूम च्या समोर त्यांना मोटरसायकल अडवून त्यांना मारहाण केली त्यांच्या डोळ्यावरील चष्मा काढून मोटरसायकलचा नंबर पाहू नये म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच यावेळी समोरून आणखीन एका मोटरसायकलवर तिघे जण आले व त्यांनीही डोक्यात व चेहऱ्यावर मारहाण केली या झटापटीत त्यांच्या खिशात असलेले रुपये 5000 देखील त्यांनी घेतले नंतर त्या गुंडांनी तेथून पाथरी रोड कडे पलायन केले
याबाबत सेलू पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात येत असून गुन्हेगारांना लवकरच पकडण्यात येईल असा विश्वास सेलू पोलिस ठाण्याचे एपी आय जमादार यांनी सांगितले असून गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवडल्या जातील असे सांगितले
यांनी दिलीप दासाळकर यांनी गेल्या काही दिवसापासून नगर परिषदेतील भ्रष्टाचार बाबत प्रसिद्ध केलेले असून त्या व्रताची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणातील चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्यामुळे मुळे सरांना मारहान झाली त्यामुळे पत्रकार दिलीप डासाळकर यांना मारहान झाली असावी अशी शंका दिलीप डासाळकर यांनी व्यक्त केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें