सेलू प्रतिनिधी
सेलू येथील सारंगी गल्ली भागातील असलेल्या पोलिस कॉटर लगत असलेल्या मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमी बांधून देण्याचे आश्वासन नगरपरिषदेने दिले होते त्यास सहा महिने उलटून गेले तरी अद्याप पर्यंत ते आश्वासन पाळले नाही त्यामुळे पुन्हा 10जुलै 2019 पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा मुस्लिम समाजातील नागरिकांनी दिला आहे
याबाबतचे वृत्त असे की गेल्या 26 जानेवारी 2019 रोजी येथील सारंगी गल्ली भागातील काही नागरिक स्मशान भूमी बांधून देण्यासंदर्भात आमरण उपोषणास बसले होते यावेळी नगरपरिषद सेलूचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी सेलूचे उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्याशी चर्चा करून सारंगी गल्ली येथील मुस्लिम समाजाची स्मशानभूमी बांधकामाची तांत्रिक मान्यता घेऊन जिल्हाधिकारी परभणी यांचेकडे मान्यतेस पाठवून देण्यात येईल तदनंतर पंधरा दिवसात स्मशानभूमीचे बांधकाम तात्काळ करण्यात येईल तसेच सेलू शहराची वाढती लोकसंख्या पाहता सध्याच्या स्मशानभूमीची जागा अपुरी पडत असल्यामुळे वाढीव दहा एकर ची जागा देण्यात येईल असे लेखी आश्वासन नगरपालिका सेलू च्या वतीने दिले होते तसेच त्यावेळी उपोषण मागे घेण्याबाबत चे पत्रही दिले होते या घटनेस आज सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे मात्र तरीही अद्याप पर्यंत सदरील स्मशानभूमीच्या बांधकामाबाबत कुठलाच निर्णय घेतलेला नाही अथवा स्मशानभूमी बांधून देण्याबाबत कुठलीच प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे परत होऊन स्मशानभूमीचे बांधकाम तसेच संरक्षण भिंत बांधून देण्यात येणार नाही तसेच स्मशानभूमी करता वाढीव दहा एकर जागा देण्यात येणार नाही तोपर्यंत येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असे लेखी निवेदन उपजिल्हाधिकारी नगरपरिषद सेलू यांना देण्यात आलेले आहे दिलेल्या निवेदनावर लालू खान सय्यद नियाजोद्दीन शेख इसाक पटेल मोहम्मद रफीक बेलदार असलम खान खाजाहुसेन बेग आदींच्या स्वाक्षऱ्या असून दहा जुलै 2019 पासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिलेला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें