शाळेच्या आवारात मुलीवर बलात्कार करणार्या नराधमास अटक करा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 12 जून 2019

शाळेच्या आवारात मुलीवर बलात्कार करणार्या नराधमास अटक करा.

राकाँ महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते यांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.


परभणी (विशेष प्रतिनिधी)
         राज्याची उपराजधानी नागपुर येथे शाळेच्या आवारात ४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमाणुषपणे बलात्कार करणाऱ्या नराधमास तात्काळ अटक करून कठोर शासन करावे अशी मागणी१२ जुन रोजी राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा तथा जि.प.उपाध्यक्षा सौ भावनाताई नखाते यांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी पि.शिव शंकर यांचे कडे केली आहे.
          नागपुर येथील शाळेतील ४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष पणे केलेल्या बलात्कार हा मानुसकीला काळीमा फासणार्या घटने  प्रकरणी  राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला जिल्हाध्यक्षा तथा जि.प.उपाध्यक्षा सौ भावनाताई अनिलराव नखाते यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी पि .शिवशंकर यांची १२ जुन रोजी भेट घेऊन चर्चा केली या शिष्टमंडळात शहराध्यक्षा नंदाताई राठोड,मानवत तालुकाध्यक्षा अर्चना भिसे,रेखा औटे,आशा नखाते यांचा सामावेश होता .यावेळी दिलेल्या निवेदनात बलात्कार करणार्या नराधमास तात्काळ अटक करून कठोर शासन करावे .व यापुढे मुलीकडे वाईट नजरेणे कोणी पाहण्याची हिंम्मत करू नये अशी कायदेविषयक कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें