आणि अखेर सेलू नपचे आयुब अमिनुद्दिन यांचेकडील सर्व पदभार काढून टाकले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 जून 2019

आणि अखेर सेलू नपचे आयुब अमिनुद्दिन यांचेकडील सर्व पदभार काढून टाकले.


सेलू प्रतिनिधी पठाण समशेर खान


सेलू नगर परिषदेत सहाय्यक करनिरीक्षक तथा आस्थापना विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले म आयुब अमिनुद्दिन यांच्याबाबत जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन अधिकारी परभणी यांच्या निर्देशानुसार म आयुब अमिनुद्दिन यांच्याकडील सर्व पदभार काढून घेण्यात आलेले आहेत

म आयुब अमिनुद्दिन हे सेलू नगर परिषदेत नोकरीत असून त्यांनी अधिकार नसताना विविध महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करून तसेच त्यांची पत्नी नगरसेविका असताना स्वतः नगरसेवक असल्याचे भासवून प्रसारमाध्यमांकडे मुलाखत देणे त्यांच्या अंगलट आले असून याबाबत दिलीप डासाळकर यांनी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे एक वर्षापूर्वी तक्रार केली होती व त्या तक्रारीच्या अनुषंगाने डासाळकर यांनी सदरील तक्रारीचा पाठपुरावा करत जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडून या प्रकरणाबाबत सतत पाठपुरावा करून चौकशी करण्याकरिता तगादा लावला होता या प्रकरणात सेलूचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून  सदरील प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून दिला होता त्यानुसार देविदास जाधव यांनी आयुब अमिनुद्दिन यांना कार्यालयीन नोटीस देऊन खुलासा मागवला होता मात्र त्यांनी दिलेला खुलासा समाधान कारक नसल्यामुळे  त्यांच्याकडील असलेले सर्व पदभार दिनांक 11 जून 2019 पासून काढून टाकण्यात येत आहेत या आशयाचे पत्र देऊन त्यांच्याकडील कार्यभार काढून घेतले आहेत व त्यांच्याकडील पदभार प्रशासकीय अधिकारी एस बी राठोड यांच्याकडे देण्यात आला असून सदरील प्रकरणात आयुब अमिनुद्दिन यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी व ती कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होईल अशी अपेक्षा आहे

म  आयुब अमिनुद्दिन यांनी पदाचा गैरवापर करत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रावर स्वाक्षऱ्या करून शिस्तभंग केलेला आहे तसेच त्यांची पत्नी नगरसेविका असताना स्वतः नगरसेवक असल्याचे भासवून प्रसारमाध्यमात मुलाखत दिलेली आहे याशिवाय त्यांच्याबाबत अनेक महत्त्वाच्या बाबतीत व आर्थिक प्रकरणात देखील अनेक नागरिकांनी तक्रारी केलेले असून याबाबत देखील नगरपरिषदेकडे कागदपत्रांची मागणी केली असता संबंधित कागदपत्र दिल्या जात नाहीत त्यामुळे अशा प्रकारच्या चौकशांना खीळ बसते अथवा चौ कशाच होत नाहीत तरी मुख्याधिकारी यांनी याबाबत दखल घेऊन अनेक प्रकरणांचा निपटारा करण्यात प्राधान्य द्यावे अशी मागणी होत आहे

विशेष म्हणजे म आयुब अमिनुद्दिन हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर गेले असून पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत मात्र त्यातच अशाप्रकारे चौक अशांची झेंगट मागे लागल्यामुळे तसेच यानंतरही त्यांच्याबाबत कुठल्या कुठल्या तक्रारी येतात व त्यावर काय कार्यवाही होते हे पाहणे गरजेचे आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें