पी टी आर अपहाराती सहा लाख भरले : निलंबित कर्मचाऱ्याला आठच दिवसात कामावर घेतले.
सेलू प्रतिनिधी
वादग्रस्त सेलू नगरपरिषदेत चालत असलेला कारभार चव्हाट्यावर आला असून कोणाचा मेळ कुणाला स नसल्यामुळे काय होत आहे हेच कुणाला कळत नाही त्यामुळे सेलू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देविदास जाधव हे शासनाने ठरवून दिलेल्या चाकोरीत काम न करता मनमानी करत आहेत की त्यांच्यावर नगराध्यक्षांचा दबाव असून त्या दबावाखाली काम करत आहेत हेच कळेनासे झाले आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून सेलू नगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी चव्हाट्यावर आली असून पी टी आर वसुलीच्या रकमेत अपहार झाल्याचे वृत्त व तक्रार देताच संबंधित कर्मचाऱ्याने कुठलीही आणि कुठल्याही अधिकाऱ्याची परवानगी न घेता सहा लाख रुपये भरले आहेत त्यामुळे एक प्रकारे चोरी केल्याचे मान्य करून पैसे भरले तर आणखी एका प्रकारात निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याला केवळ आठ दिवसात कुठलीही चौकशी न करता परत पुन्हा कामावर रुजू करून घेतल्याचा खळबळजनक प्रकार घडला असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे
याबाबतचे वृत्त असे की गेल्या काही दिवसापासून सेलू नगर परिषदेत अनागोंदी कारभार चालत असून याबाबत सातत्याने तक्रारी आणि पेपर बाजी होत आहे मात्र सदरील प्रकरणासंदर्भात तत्काळ आणि सक्षम अधिकाऱ्याकडून योग्य ती कार्यवाही होत नसल्यामुळे नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढत आहे
अशाच एका प्रकरणात नगर परिषदेतील कर्मचारी सत्यनारायण पिंडकुरवार यांनी चुकीच्या पद्धतीने नामांतर केल्यामुळे त्यांना दिनांक 18 जून रोजी निलंबित केले होते मात्र या प्रकरणाची कुठली चौकशी न करता पिंडकुरवार यांनी केलेली चूक दुरुस्त केल्यामुळे तसेच माफीनामा लिहून दिल्यामुळे त्यांना परत पुन्हा आठ दिवसातच कामावर रुजू करून घेतल्याचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी सांगितले मात्र कुठलीही चौकशी न करता तीन महिन्यापर्यंत संबंधित कर्मचाऱ्याला कामावर रुजू करून घेता येते का ? तसेच त्या कर्मचाऱ्याला पुन्हा त्याच जागेवर ठेवता येते का या बाबी अनुत्तरीतच आहेत मग त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची आणि लगेच कामावर रुजू करून घेण्याची एवढी घाई का ?
तसेच अन्य एका प्रकरणात नगरपरिषदेतील पीटीआर वसुली विभागात झालेल्या अपहाराची प्रकरणे यांची देखील तक्रार बाजी व पेपरबाजी होताच नगरपरिषदेतील आस्थापना प्रमुख मोहम्मद आयुब अमिनुद्दिन यांच्याकडील असलेले सर्व पदभार जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार 11 जून 2019 रोजी काढून घेतले होते व त्यानंतर 16 जून 2019 पासून आयुब अमिनुद्दिन हे एक महिन्याच्या रजेवर गेले होते त्यांची रजा मंजूरही झाली होती मात्र अचानकपणे याबाबतची चक्रे फिरली आणि दिनांक 26 जून 2019 रोजी यात आयुब अमिनुद्दिन यांनी पीटीआर वसुली आपहारातील रकमेपैकी रुपये पाच लाख 94 हजार 482 एवढी रक्कम परस्पर कुणाचीही मंजुरी न घेता नगरपरिषदेच्या खात्यावर जमा केलेली आहे तसेच त्यांचेकडील काढून घेतलेले पदभार त्यांना पुन्हा बहाल करून आस्थापना प्रमुख म्हणून रुजू करून घेतले आहे विशेष म्हणजे 16 जून पासून एक महिन्याची रजा घेऊन ती मंजूरही झाली होती मात्र हे सर्व बाजूला सारून केवळ दहा दिवसातच त्यांना पुन्हा आस्थापना प्रमुख म्हणून पदभार दिलेला आहे या सर्व गोष्टी नियमबाह्य असून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याकडून दोन महिने अगोदर कुठलेही जबाबदारीचे पद त्यास न देता निवृत्ती घ्यायची असते मात्र सेलू नगर परिषदेत सर्व अघटित घटना घडत असून यास कोण जबाबदार आहेत हा प्रश्न पडतो की येथे मुख्याधिकारी देविदास जाधव हे मनमानी करीत असून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कुठलीच माहिती नसते अथवा मुख्याधिकारी हे पदाधिकारी आणि नगराध्यक्षांच्या दबावाखाली काम करतात हेच कळेनासे झाले आहे
वरील दोन्ही प्रकरणे चौकशीच्या अधीन असून त्या प्रकरणांची चौकशी होणे गरजेचे आहे तसेच या प्रकरणाची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत या दोन्ही कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवावे अथवा कुठलीही जबाबदारी देऊ नये अशी मागणी होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें