योगेश मोरे (प्रतिनिधी)
औरंगाबाद
दि.02.06.2019
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यात कार्यरत आहे .संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दूबाले हे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासन गृह विभाग समन्वय समिती वर आहेत. तसेच मा.शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे निकटवर्तीय म्हणून दुबाले साहेबाचा परीचय आहे. संघटना महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या न्याय हक्का साठी लढते .संघटनेने खूप मुद्दे मंजूर करून घेतले आहेत .ही संघटना पोलीस बॉईज म्हणजेच पोलीस पुत्र व सामाजिक चळवळीत काम करत असलेल्या व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेत काम करण्याची इच्छा आहे व ज्यांचा कुठल्याही पक्षाशी काहीही संबंध नाही, अश्या लोकांना युवकांना, महिला ,मुली ,प्रौढ अश्या सर्व लोकांना पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि आपल्या गावासाठी संघटनेत सामील करून घेत आहेत. तसेच अनेक अधिकारी सेवानिवृत्त झालेली पण या संघटनेचे काम मोठ्या उत्साहाने करत आहे.अशा संघटनेत दरेकर यांना मा.दुबाले साहेब यांनी मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे....औरंगाबाद जिल्हाअध्यक्षपदी रामेश्वर एस.दरेकर यांची निवड करुन समाजाची तसेच पिडित ,अन्यायात अडकलेल्या तसेच असंख्य समस्याने ग्रासलेल्या पोलिस कर्मचारी अधिकारी याचे प्रश्न शासन दरबारी मांडता येतील. ही जबाबदारी "रामेश्वर दरेकर" संपूर्णपणे अनेकांच्या सहकार्याने यशस्वी पणे पार पाडेल अशी खात्री वाटत आहे. सर्वांना अभिमान वाटेल असे काम नक्कीच दरेकर हे करेल.आजपर्यंत केलेल्या निर्भिड कार्याची दखल मा.राहुल दुबाले साहेब यांनी घेतली.आज औरंगाबाद येथील तंत्र निकेतन संचालनालय सहसंचालक मा.महेश दतोपंथ शिवणकर दुबाले यावेळी उपस्थित होते.यावेळि शिवणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कर्मसिंग नारायण सिंह सरदार यांना औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष हे पद जाहीर करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें