जिंतूर तालुक्यातील सावरगांव येथील एक तरुण शेतकरी श्री भूजंग रामभाऊ ढवळे वय 46 वर्षे यांनी महिंद्रा फायनान्स कंपनी च्या सततच्या कर्जवसुली च्या तगाद्यास कंटाळून आत्महत्या केली.
या शेतकर्याने महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी कडून घरबांधणीसाठी ग्रहकर्ज घेतले होते. मात्र सततची नापिकी व दुस्काळ या समस्येमुळे ते कर्जाचे काही हप्ते भरू शकले नाही. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वसूलीसाठी पोलीस केस व घरजप्तीची धमकी दिल्यामुळे या शेतकर्याने आपल्या शेतामध्ये जाऊन एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकर्यांस केवळ एक एकर शेती आहे. त्यांच्याकडे इतर कुठल्याही प्रकारचे उपजीविकेचे साधन नव्हते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनिता भुजंगराव ढवळे वय 39 वर्षे दोन विवाहित मुली व दोन लहान मुली ज्यांचे वय 12 वर्षे व 8 वर्षे आहे.
आज दि. 2/6 /2019 रविवार रोजी जिंतूर सेलु विधानसभा प्रमुख श्री रामनाना पाटील यांनी या शेतकर्यांच्या कुटुंबास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व 10000/_दहाहजार रू ची आर्थिक मदत केली.
या वेळी त्यांच्यासोबत श्री विठ्ठलराव जाधव, श्री विठ्ठलराव कारके महाराज(वारकरी संप्रदाय संघटना ता. अध्यक्ष सेलु) तसेच सावरगांव येथील श्री राजेभाऊ ढवळे, प्रभाकर लिखे, गजानन कास्टे, रविकुमार देशमुख, आप्पासाहेब लिखे, सुभाष ढवळे, पांडुरंग कास्टे, केशव ढवळे, उद्धव ढवळे इत्यादी गावकरी उपस्थित होते.
या घटनेमुळे सावरगांव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें