सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील सेलू वालुर रस्त्यावरील ब्राह्मणगाव शिवारात नालीचा ढापा टाकण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन एकास डिझेल टाकून जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली आहे
याबाबतचे वृत्त असे की सेलू तालुक्यातील सेलू वालुर या रस्त्यावर ब्राह्मणगाव आहे छोटेसे गाव असून या गावात शुक्रवार दिनांक 14 जून 2019 रोजी नाली टाकण्याच्या कामावरून सतीश बरसाले व अन्य दहा-बारा लोकांमध्ये वादावादी झाली होती त्या वादावादी वरून सतीश बरसाले हा शेतात जातेवेळी त्याचे ट्रॅक्टर अडून उद्धव खोसे दिगंबर खोसे आसाराम खोसे राजाभाऊ खोसे जीवन खोसे नामदेव नामदेव खोसे गणेश खोसे काशिनाथ रामप्रसाद खोसे संपत्ती खोसे दत्ता खोसे कारभारी खोसे आदी दहा लोकांच्या ग्रुपने सतीश यास आडवून त्याच्या अंगावर डिझेलची कॅन टाकून त्यास जिवंत पेटवून दिले यात सतीश बरसाले हा जागीच मृत पावला
सदरची घटना ब्राह्मणगाव शिवारात सकाळी नऊ वाजता घडली असून सदरचे वृत्त सेलू पोलिसांना कळाल्यानंतर सेलू पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली या घटनेत मृत पावलेल्या सतीश बरसले यांचे सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता घेऊन गेल्यानंतर तेथेच शवविच्छेदन करण्यात आले या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी सेलू पोलीस ब्राह्मणगाव येथे गेले असता वरील सर्व आरोपी पैकी केवळ कारभारी खोसे या एकाच आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित सर्व आरोपी फरार आहेत मात्र हे सर्व आरोपी सरपंचाच्या गटाचे असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे त्यामुळे सदरची घटना ही ही राजकीय हेवेदावे यातून झाली की काय याबाबत चर्चेला उधाण आलेले आहे
सदर घटनेची नोंद सेलू पोलिसात करण्यात आली असून आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदिपान शेळके हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें