परभणी/ प्रतिनिधी
दि.१६: परभणी येथील दर्गारोड परिसरात प्रभाग क्र.११ येथील पोटनिवडणुक येत्या २३ जुनरोजी होणार असुन यासाठी अॉल ईडिया मजलीस ए ईत्तेहादुल मुस्लीमीन एम आय एम पक्षांच्यावतीने फातेमा अब्दुल जावेद यांनी प्रचारात आघाडि घेतली असुन ह्या याच प्रभागातील स्थानिक उमेदवार असल्याने त्यांची नगरसेवकपदी निवडुण येण्याची शक्यता आहे व अॉल ईडिया मजलीस ए ईत्तेहादुल मुस्लीमीन पक्षांचा महानगरपालीकेत खाता हि उघडणार असल्याची चर्चा प्रभागातील नागरीकांत होत आहे.
दर्गारोड प्रभाग क्र.११ येथील नगरसेवक महम्मद नईम यांचे जातप्रमाणपञ अवैध ठरल्याने या प्रभागात पोटनिवडणुक होत आहे यात एम आय एम पक्षांच्यावतीने फातेमा अब्दुल जावेद निवडणुक रिंगणात असुन प्रभागातील स्थानिक उमेदवार असल्याने जनतेमधुन त्यांना पसंती मिळत असल्याचे दिसते या प्रभागात राज बेलदार समाज मोठ्याप्रमाणात असुन या समाजाचे नेतृत्व माजीनगरसेवक सय्यद नोमान हुसेनी कौसर हे करत असुन या समाजाचे एकगठ्ठा मतदान एम आय एम पक्षाकडे वळणार असल्याचे दिसत आहे व विद्यमान नगरसेवका विरुध्द नागरीकांत असंतोष असल्याने याचा फायदा हि फातेमा अब्दुल जावेद यांना होणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें