पाथरी तालुक्यासह शहरात रमजान ईद आनंदाने व उत्साहात साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 5 जून 2019

पाथरी तालुक्यासह शहरात रमजान ईद आनंदाने व उत्साहात साजरी.


पाथरी तालुका प्रतिनिधी.
पाथरी शहरात ईद उल फितर (रमजान ईद)हा मुस्लिम समाजात साजरा केला जाणारा सण फार मोठया उत्साहाने आणि शांततेत पार पडला.
शहरातील सर्व मुस्लीम समाजातील नागरीक तरुण वयोवृद लहान मुले ईदगाह मैदानवर वेळेवर सामील झाले.सर्व या वेळी अल्लाह चा दीलेला संदेश एकण्यात मग्ण होती.हा ईद उल  फितर (रमजान ईद  चा सण मुस्लीमांना एकतेचा संदेश देतो आणि तसेच आपल्या बंधुना आपल्या नुसार मदत करण्याचा हुकुम देतो तसेच या महीण्यात अल्लाह ने दिलेले मानसावर कर्तव्य रोजे  व नमज याचा महत्व दर्शवले हा महीना जगातील सर्व समाजातील लोकांना एकतेचा आणि मानवतेचा संदेश देतो तसेच या पविञ रमजान महीण्यात कुरआन शरीफ अल्लाह ने पुथ्वी तलावर सर्व जगातील लोकांकरीता प्रकट केले आहे.यात ज्ञानचे महत्व सर्व जगाकरीता धार्मिक व जागतिक शिक्षण हस्त करणे अल्लाह चा हुकुम दर्शविला आहे.
ईद निमित्त खतीब सहाब व इमाम सहाब तसेच मुफ्ती साहेबांनी रमजान ईद उद्देशाने सर्व मुस्लीम विविध समाजास ईदचे महत्व दर्शविले व एकतेचा संदेश दिला.नमाज नंतर दुआ करण्यात आली व सर्व जगासाठी शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली व सर्वाच्या प्रगतीसाठी सुरक्षिततेसाठी दुआ करण्यात आली.तसेच पाऊससाठी ही दुआ करण्यात आली आहे.
या वेळी मुस्लीम बांधवानी नमाज नंतर ईदगाह मैदान स्थाळवर सर्वा जाती धर्मांचे व विविध पक्षाचे पुढारी कार्यकर्ते एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी चोख पोलीस बंदोबस्तात ही नमाज अदा करण्यात आली आहे.शहरात शांतते  व उत्साहात मध्ये रमजान ईद साजरी करण्यात आली दिवस भर सर्व  समाजातील लोक एकमेकांना शुभेच्छा देवाण घेवाण चे चिञ दीसुन येत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें