सेलू प्रतिनिधी
सेलू : येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्यावतीने शुक्रवार दि. ०७ रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात आयोजित कविता मिरगाच्या कार्यक्रमात प्रभावीपणे सादर झालेल्या कवितेने रसिक श्रोते भारावून गेले. जालना येथील कवयित्री कवी संमेलनाच्या अध्यक्षा डाॅ.संजीवनी तडेगावकर यांनी स्ञियांच्या मनोव्यथेला वाचा फोडली ती अशी,
अस्तूरी जलम देव घालून चूकला
सोय-याच्या ग दारामध्ये बैल घाण्याला जूपला
अमरावती येथील कवयित्री अलका तालमकर यांनी पावसाकडे बळीराजासह जनमानसाचे गाह्राने मांडले. त्या आपल्या कवितेत म्हणतात,
आम्हा गरिबांच्या माथी छळ मांडलास मेघा
काळजाच्या झडपाला किती पाडशील भेगा
सभागृहात एकाहून एक दर्जेदार मिरगाच्या कवितेचा व रसिक श्रोत्यांच्या प्रतिसादाचा पाऊस बरसतांना पाहून ढगांतील पावसालाही पडण्याचा मोह आवरला नाही. कार्यक्रमापुर्वी आणि नंतरही मिरगाच्या सरी बरसत राहिल्या.
नांदेड येथील कवी श्रीनिवास मस्के यांनी आपल्या कवितेतून चिञित केलेल्या स्ञी वेदनेने श्रोते ही भावनिक झाले. ते म्हणतात,
तिच्या काळजाला भेग कुठ दिसना भी रेघ
बाईपणाच जगण विस्तवाशी सोईरपण
नांदेड येथीलच कवी डाॅ. विनायक येवले यांनी आपल्याकडील उणीवेचे दुःख मांडले ते असे,
ज्याचे त्याला देत जावे
सुटत जावे देणेदारांच्या तगाद्यातून
नव्हतेच माझे कुणाकडून काही येणे
उंबरठे झिजवण्याची तसदी पडलीच नाही
केज येथील कवी अनिल गव्हाणे शेतकय्रांना उद्देशून म्हणतात,
राब राबुनीया राजा तुच दुनिया पोसली
तुच जगाचा पोशिंदा तुला चिंता रे कसली
औरंगाबाद येथील कवयित्री प्रा.संध्या फुलपगार अचिंतलवार यांनी सादर केलेल्या कवितेला रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्या आपल्या प्रेम कवितेत म्हणतात,
तू येना पावसासारखा धावून
मी मातीसारखी वाट पहाते
कविता मिरगाच्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक गौतम सुर्यवंशी आणि बबन आव्हाड यांचा उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्जेराव लहाने यांनी केले. सुञसंचालन शरद ठाकर यांनी तर आभार प्रदर्शन काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश हिवाळे,रमेश नखाते, एकनाथ जाधव, किशन कटारे, प्रा.सतीश मगर,दिगंबर रोकडे,प्रा.अनंत मोगल,प्रा.संभाजी रोडगे,माधव गव्हाणे यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें